भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याबाबत ‘हे’ माहिती का ? जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भाजपचे कार्यकारी अध्यक्ष असलेले जे पी नड्डा याचे पुर्ण नाव जगत प्रकाश नड्डा असे आहे. लो प्रोफाइल ते सर्वात मोठ्या पक्षाचे नेते असा जे पी नड्डा यांचा कार्यकाल बराच मोठा आहे.जेपी यांच्या आंदोलनाने प्रभावित होऊन राजकीय जीवनात पाऊल ठेवल्या नड्डा यांनी त्याची प्रतिमा एक प्रभावी आणि कुशल राणनीतिकार अशी बनवली. भाजपचे नेतृत्व बदलत राहिले मात्र पक्षात त्यांचा मान कायम राहिला. नड्डा भाजपच्या जुन्या नेतृत्वापासून ते आताच्या मोदी आणि अमित शाहांचे देखील जवळचे आणि विश्वासू मानले जातात. आता भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनल्यावर तर हे मानलेच पाहिजे की ते आता भाजपच्या ताकदवान नेत्याच्या रांगेत जाऊन बसले आहेत.

जेपींच्या आंदोलनात सहभाग, विदयार्थी नेता –

बिहारमध्ये जन्मलेले नड्डा हे 16 व्या वर्षीच जेपींच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर थेट विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले. त्यांचे काम पाहून त्यांना 1982 मध्ये हिमाचलमध्ये विद्यार्थी परिषदेचे प्रचारक बनवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेशात विवि च्या इतिहासात पहिल्यांदाच एबीवीपीला विजय मिळाला.

31 वर्षी भाजपयुमोचे अध्यक्ष –

1983-84 मध्ये ते विवि मध्ये एबीवीपीचे पहिले अध्यक्ष झाले. 1977 ते 1990 या दरम्यान त्यांनी एबीवीपी समेवत अनेक पदे भूषवली. 1989 ला तत्कालीन सरकार विरोधात भ्रष्टाचार विरोधात लढा दिला त्यासाठी राष्ट्रीय संघर्ष मोर्चा बनवला. 1991 मध्ये 31 व्या वर्षी ते भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 1993 मध्ये ते हिमाचल प्रदेशात आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हिमाचलमध्ये ते आरोग्य मंत्री होते त्यावेळी त्यांनी वन आणि पर्यावरण, विज्ञान-तांत्रिकी मंत्रालय सांभाळले.

2012 ला ते राज्यसभेत पोहचले आणि अनेक संसदीय समितीच्यामध्ये आपली उत्तम भूमिका निभावली. तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या टीम मध्ये राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्ता म्हणून काम पाहिले. शांत स्वभाव, साधेपणा आणि मेहनत या प्रतिमेमुळे त्याचे भाजपमध्ये एक विशेष स्थान निर्माण केले.संघटन करण्याबरोबरच निवडणूक व्यवस्थापनात महत्वाचे काम पाहिले. त्यात त्यांना यश देखील आले. मागील 5 वर्षात नड्डांनी भाजपसाठी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपला मिळाले यश –

2019 मध्ये त्याच्याकडे उत्तर प्रदेशचा प्रभार देण्यात आला होता. जेथे सपा बसपाच्या गठबंधनामुळे भाजपला कमी जागा मिळतील असे सांगितले जात असताना मात्र उत्तर प्रदेशात भाजपला मोठे यश मिळाले. तेथून भाजपला 62 जागा मिळाल्या. यात नड्डा यांची रणनीती चालली आणि भाजपला 49.6 टक्के मतदान झाले.
मोदींसोबत चांगले संबंध –

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सोबत नड्डा यांचे चांगले संंबंध आहे. मोदी जेव्हा हिमाचलचे प्रभारी होते तेव्हा पासून त्यांच्यातीन नाते आणि समीकरण चांगले झाले. दोघेही अशोक रोड येथे असलेल्या भाजप मुख्यालयात असलेले आऊट हाऊसमध्ये राहत होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात आरोग्यमंत्री म्हणून पदभार त्यांनी सांभाळला.यावेळी नड्डांनी मंत्री पदाची शपथ घेतली नाही त्यावेळीच नड्डांना पक्षाचे अध्यक्ष बनवले जाईल असे मानले जात होते. ज्यावर अखेर सोमवारी निर्णय देत त्यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका

सिने जगत

‘बिग बी’ अमिताभच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल साराने केली होती सैफकडे ‘तक्रार’

…म्हणून ‘डर’ सिनेमानंतर शाहरुख खानसोबत 16 वर्ष बोलत नव्हता ‘खासदार’ सनी देओल