दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीघांना खडकी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.२७) रात्री पावणे अकराच्या सुमारास नेहरु नगर खडकी येथील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली.

अरबाज समीर खान (वय-२० रा. जुना बाजार खडकी), शहादाब रहीमज खान (वय-२३ रा. रा. जुना बाजार खडकी), दाऊद दिलावर शेख (वय-२१ रा. खडकी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रदिप गाडे यांनी फिर्य़ाद दिली आहे.
[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e086246c-7b8e-11e8-9420-9123a7e2150d’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी येथील त्रिकोणी गार्डन जवळील पाण्याच्या टाकी खाली तीन इसम दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाण्याच्या टाकी जवळून तीघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाईल, दोन लोखंडी तलवारी, एक चाकू, तीन स्क्रु-ड्रयव्हर असा एकूण सहा हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.