मद्यपीकडून वाहतूक पोलीसाला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

ड्रंक अॅड ड्राईव्हची कारवाई करत असताना स्वारगेट वाहतूक विभागातील पोलीस शिपाई महेंद्र वत्रे यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी एका मद्यपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.१६) रात्री साडे आठच्या सुमारास शंकरशेठ रोडवर घडला.

अजीज रमजान तांबोळी (वय-३२ रा. नाना पेठ पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर महेंद्र वत्रे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवारी रात्री महेंद्र वत्रे हे शंकरशेठ रोडवरील ढोले पाटील चौकात ड्रंक अॅड ड्राईव्हची कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपी अजीज तांबोळी हा त्याच्या मित्राच्या दुचाकीवरुन मद्यपान करुन जात होता. वत्रे यांनी त्यांची दुचाकी अडवली असता पाठिमागे बसलेल्या तांबोळी याने वत्रे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास खडक पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक एस.पी. टेरे तपास करीत आहेत.