सासरी जाणाऱ्या मुलीनं बनवलेला ‘हा’ VIDEO, अनेकांच्या ‘भुवया’ उंचावल्या (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या टीकटॉकचे वेड अनेकांना लागलं आहे. टीकटॉक व्हिडिओ बनवून अनेक जण फेमस होण्याचा प्रयत्न करतात. असाच एक नववधूच्या बनवलेला टीकटॉक व्हिडिओ चर्चेत आला आहे. सासरी जाताना तिने गाडीतच टीकटॉक व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलं नाही.

সে অনেক দিন আগের কথা যখন মেয়েরা বিয়ে করে শ্বশুর বাড়ি যাওয়ার সময় কাঁদতে😢আর এখন ভিগো ভিডিও বানাতে বানাতে যায় 😂😂😂

Geplaatst door বাংলার ব op Maandag 29 juli 2019

काय आहे व्हिडिओ
सासरी जाणाऱ्या नववधूच्या बनवलेल्या व्हिडिओने रिती, परंपरा बदलून टाकल्या आहेत. आई वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी जाताना मुलीचे डोळे पाण्यानं भरलेले असतात. मात्र ही नववधू एका हिंदी चित्रपटातील गाण्यावर एक्सप्रेशन देत आहे. विशेष म्हणजे तिने हा व्हिडिओ नवऱ्याच्या घरी जाताना गाडीतच शूट केला आहे. हा टीकटॉक व्हिडिओ तिने तिच्या फेसबुकवर शेअर केला आहे.

You might also like