तरुणीकडे शरीर सुखाची मागणी करणारे गजाअाड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये घरकाम करणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरूणीला अडवून, चौघांनी शरीर सुखाची मागणी करत छेडछाड केली. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6cae9e71-8416-11e8-ace0-8d7a701c4bf4′]

या प्रकरणी पीडित तरुणीने चतृशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर मयूर अशोक शिंदे (२१, रा. वडारवाडी) आणि मानव राजेश लालबेगी (१८, रा. पांडवनगर) या दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी घरकाम करते. रविवारी रात्री ती आनंद हौसिग सोसायटी येथून पायी जात होती. त्यावेळी या चौघांनी तिला अडवले. तिची छेड काढून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तरुणीने तिची सुटका करून घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तपास पोलीस करत आहेत.