मोठ्या भावाबरोबर ‘लफड’ असल्याचा समज करुन महिलेचा ‘विनयभंग’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या मोठ्या भावाबरोबर लफड असल्याचा समज करुन एकाने महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन करुन विनयभंग केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी राजकुमार पारुमल रामचंदानी (वय ५५, रा. अशोक टॉकीजजवळ, पिंपरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना पिंपरी कॅम्पमधील या महिलेच्या गोदामासमोर २५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजकुमार रामचंदानी यांचा मोठा भाऊ रमेश याच्यावर फिर्यादी महिलेचे लफडे आहे, असा त्याने समज करुन घेतला. या फिर्यादीने आरोपीविरुद्ध यापूर्वी तक्रारी केली होती. त्यामुळे रामचंदानी याने या महिलेच्या गोदामाजवळ येऊन त्याच्या गेटवर लघुशंका केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आल्या असताना राजकुमार याने त्यांना अश्लिल शिवीगाळ केली व त्यांचा उजवा हात पकडून त्यांच्याबरोबर लज्जास्पद वर्तन केले.

Visit : policenama.com