दापोडीत कोयत्याने सपासप वार करुन तरुणाचा खुन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दापोड़ी येथे पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खुन करण्यात आला. तर दोघांवर खुनी हल्ला करण्यात आला असून दोघेजण जखमी झाले आहेत.

अल्विन रवी राजगोपाल (१९ , रा. कैलास जाधव चाळ, जयभीमनगर, दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी क्लेरा रॉबर्ट किट्टो यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण (२६), रुपेश दिलीप संकपाळ (२०), राहुल वीर उर्फ पप्प्या (2०), निखील, सनी गजभीव (२०, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे दोनच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून, पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून अल्विन रवी राजगोपाल यांच्यावर कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच पेव्हिंग ब्लॉक आणि दगडाने मारहाण करून त्याचा खुन केला. यावेळी सोडविण्यासाठी आलेल्या क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल यांनाही मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. तपास भोसरी पोलिस करीत आहेत.