दारुचा ट्रक लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीणच्या हद्दीतून चालकाला मारहाण करून दारुचा ट्रक चोरून नेणाऱ्या टोळीला आणि मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपींना पुणे गुन्हे शाखा युनिट -३ ने अटक केली आहे. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोड्याच्या तयारी असलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने महापालिका येथील बसस्टॉप जवळून अटक केली.

सुधीर अरुण गायकवाड (वय-२९ रा. बहुली गायकवड वाडी ता. हवेली) याला अटक केली. दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी गायकवाड हा गावी जाण्यासाठी महापालिका येथील बस स्टॉपजवळ येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर आणि संदिप तळेकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. पुढील कारवाईसाठी आरोपीला सासवड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेने केलेल्या दुसऱ्या कारवाईत पप्पु उर्फ प्रकाश गायकवाड, दत्ता गायकवाड, अनिल भगत, बंडा काशीद, तुषार विभुते असे दारूचा ट्रक लुटणाऱ्या टोळीतील आरोपींना अटक केली. आरोपींनी मुकेश अशोककुमार गुप्ता (वय-३३ रा. बिहार) यांच्या ताब्यातील दारूचा ट्रक खळद येथे २३ मे २०१८ रोजी आडवून ट्रक चोरून नेला होता. आरोपींनी ट्रकमधील इम्पेरियल ब्ल्यु कंपनीच्या दारुच्या बाटल्यांचे ९२४ बॉक्स मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ५५ लाख ३३ हजार १४ रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता. या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण काद्यानुसार सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हि कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, राजकुमार केंन्द्रे, पोलीस कर्मचारी अनिल शिंदे, संतोष क्षीरसागर, प्रविण तापकीर, संदीप तळेकर, दत्तात्रय गरुड, शकील शेख, अतुल साठे, संदिप राठोड, विल्सन डिसोजा यांनी केली.

आरोग्यविषय वृत्त –