धुळ्यात घरफोडी ; हजारोंची रोकड लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – घरातील व्यक्ती बाहेरगावी गेले असता घरफोडी करुन हजारोंची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारस देवपुरकर (प्लाॅट नं.13, गोंदुर रोड, गुलमोहर काॅलनी, धुळे) यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती, सोनार समाजातील सामाजिक कार्यकर्ते पारस देवपुरकर हे परिवारासह शेगाव येथे देव दर्शनासाठी गेले होते. घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. देव दर्शनाहून परत आल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराची पाहणी केल्यानंतर 50 हजार रुपये आणि 3 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर देवपुरकर यांनी देवपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
देवपूर पोलीस अधिक तपास करित आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

डॉक्टर प्रेयसीचा लग्नास नकार ; टेक्निशियन युवकाची आत्महत्या 

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

#WomensDay : महिलादिनानिमित्त गुगलकडून ‘ती’चा खास सन्मान

शिक्षिकेने ‘त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याल्या कार्यालयातच धोपटले 

३० किलो स्फोटके वापरुन नीरव मोदीचा बंगला करणार ‘जमीनदोस्त’ 

Loading...
You might also like