धुळे : भावसार कॉलनीत चोरट्यांनी डॉक्टरांचे घर फोडले ; ‘धुम’ स्टाईल ने मोबाईल चोरी, चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यातील भवसार कॉलनीत राहणाऱ्या डॉक्टरच्या घऱावर चोरट्यांनी डल्ला मारून एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी अपार्टमेंटमधील घरांना बाहेरून कडी लावली होती. डॉक्टर बाहेर गावी गेले असून चोरट्यांनी रेकी करून त्यांच्या घरात चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील धान्य गोडाऊन परिसरातील भवसार कॉलनीत पहाटेच्या वेळी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, पाऊस पडल्यामुळे श्वान अपार्टमेंटच्या आवारातच घुटमळले. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भवसार कॉलनी परिसरातील गजराज अपार्टमेंटच्या बिल्डींगमधील तीसऱ्या मजल्यावर डॉक्टर पाठक राहतात. चोरट्यांनी आज पहाटे अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून या ठिकाणचे सर्व दिवे बंद केले. यानंतर बिल्डींगमधील घरांना बाहेरून कडी लावून डॉक्टर पाठक यांच्या बंद घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली १० हजार रुपायांची रोकड आणि दागिने असा एकूण एक लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. चोरट्यांनी जाताना आपल्या पायातील चप्पल घऱातमध्ये सोडून घरतील महागडे शूज घालून गेले.

आज सकाळी नागरिकांना घराचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी बाहेरच्या लोकांशी संपर्क साधून घराचा दरवाजा उघडला. दरम्यान डॉक्टरांचे घरात चोरट्यांनी चोरी केल्याचे समजताच पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

धुमस्टाईने मोबाईल चोरी-

रुग्णालयातील नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या बाळ ठाकरे यांचा मोबाईल दुचाकीवरू आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून चोरून नेला. बाळ ठाकरे हे कुसुंबा येथून रुग्णालयात असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. हा प्रकार शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी संतोषी माता चौकात हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळ घडला. यावेळी चोरट्या बरोबर झालेल्या झटापतीत चोरट्याने तोंडावर बंधलेला रुमाल निसटला. चोरट्याने कानामध्ये बाळी घातली असल्याची माहिती ठाकरे यांनी शहर पोलीसांना सांगितले.

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार