सिसोदिया यांच्या घरातून लाखो रूपयांचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील शिरपुर गावात चोरट्यांचा सुळसुळाट सुरुच आहे. बंद घरातून सोने, चांदीचे दागिने, रोकड लंपास चोरट्यांनी लुटुन नेली आहे. सविस्तर माहिती की, शिरपूर गावातील आमदार निवास समोरील रामसिंग रस्त्यावर विनयसिंग भगवानसिंग सिसोयदीया यांचे घर आहे. घरात दोघेही ज्येष्ठ नागरीक पती, पत्नी राहतात. मुलीचा अपघात झाला असल्याने तिची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दोघे जण परगावी गेले होते.

बंद घराचा फायदा घेत घराचे दाराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश करुन कपाट फोडुन खोलीत सगळे साहित्य जमिनीवर फेकले. कपाटाच्या कप्यातील जागेत ठेवलेले २.५० तोळेचे सोन्यांचे मंगळसुञ, ११ ग्रँम सोन्याची अंगठी, २ तोळेची सोन्याची चेन, ५ ग्रँम सोन्यांची चेन, अर्धा किलो चांदीचे तोडे, २ चांदीचे ग्लास, २ चांदीच्या वाट्या, चांदीचे शिक्के, पायल, रोख ५०००रुपये, १ टेपरेकॉर्डर, १ स्मार्ट मोबाईल असा अंदाजे २ ते ३ लाखांचा माल लुटून नेला.

चोरीची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी घटनास्थळाची पहाणी केली. तपासकामी मदतीसाठी फिंगर प्रिंट, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. नाशिक परिक्षेञातील विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोर्जे मुख्यमंञी दौऱ्या निमित्ताने धुळ्यात आले होते. त्यांना एक प्रकारे चोरट्यांनी हि सलामीच दिली आहे. शिरपुर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सकाळी घरी आल्यावर विनयसिंग सिसोदीया यांचे लक्षात आले. त्यांनी शिरपुर पोलीस ठाणे गाठत चोरीस गेलेल्या माल विषयी लेखी तक्रार नोंद केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like