दूरसंचार विभागाची नवी ‘शक्कल’ ; आता चोरीला गेलेल्या मोबाईलचे ‘नो टेंशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईलचा शोध घेऊन ही सापडत नाही. चोरलेला किंवा हरवलेला मोबाईल पूर्णपणे निरुपयोगी करण्यासाठी दूरसंचार विभागातर्फे नवी यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. ही यंत्रणा पुढील महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता असून या यंत्रणेमुळे चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल कायमस्वरुपी बंद होणार आहे. त्यामुळे मोबाईल चोरीचे प्रमाण कमी होईल. तसेच सेकंड हँड म्हणून होणारी बेकायदा विक्री बंद होणार आहे.

अशी असेल नवी यंत्रणा
नव्या यंत्रणेनुसार ग्राहकाने त्याचा मोबाईल चोरीला किवा हरवल्याचे कळवले की त्याच फोनचा आयएमईआय नंबर लगेच रजिस्टरमध्ये नोंदविला जाईल. त्याची माहिती सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना तात्काळ दिली जाणार आहे. त्या मोबाईलचा आयएमईआय नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला जाणार आहे. त्यामुळे या मोबाईलवर कोणत्याही कंपनीच सेवा मिळू शकणार नाही. मोबाईल चोरल्यानंतर चोरटे त्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरमध्ये फेरफार करून किंवा सीम कार्ड बदलून त्याचा वापर करतात. मात्र, या नव्या यंत्रणेमुळे तो फोन कोणालाही वापरता येणार नाही. तो कायमस्वरूपी निरुपयोगी राहणार आहे. ‘सी-डॉट’ने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

असे असेल नव्या यंत्रणेचे काम
प्रत्येक मोबाईला फोनला स्वत:ची ओळख देणारा १५ अंकी आयएमईआय नंबर असतो. एखाद्याने कोणत्याही सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे सीम कार्ड घालून मोबाईलचा वापर सुरु केली की हा आयएमईआय नंबर त्या कंपनीकडे आपाेआप नोंदवला जातो. सर्व कंपन्यांच्या सेवा घेणाऱ्या मोबाइल फोनच्या ‘आयएमईआय’ नंबरचे संकलन करून ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टर’ (सीईआयआर) तयार केले जाईल.

आरोग्यविषयक वृत्त

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’