गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष ?, हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांवर ‘निशाणा’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पार पडला. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या गावातच त्यांना सत्ता टिकवता आली नाही. यावर दिवसभर चर्चा होत आहे. तसेच यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गावात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष, असे मी नव्हे तर भाजपाचाच एखादा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणू शकतो, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत म्हणजे त्यांच्याच गावात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भाजपाचा पराभव झाला. या पराभवाची सोमवारी निकाल लागल्यापासूनच जिल्ह्यात व माध्यमांवरही जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे मुश्रीफ यांना आमदार पाटील यांच्यावर टीका करायला एक आयतीच संधी मिळाली. तोच संदर्भ धरून दुपारी जिल्हा परिषदेच्या सदस्यांशी बोलताना त्यांनी ही संधी मुश्रीफ यांनी हि साधली आहे.

मुश्रीफ यांच्या जिल्हा परिषदेतील भेटीवेळी भाजपाचे सदस्यही उपस्थित होते. त्यांनाही मुश्रीफ यांनी प्रत्येकी २५ लाखांचा विकास निधी दिला आणि भाजपाचे कारभारी सदस्य विजय भोजे यांच्याकडे पाहून मुश्रीफ म्हणाले, ‘अहो, ते खानापूरच्या निकालाचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही नेत्याच्या गावातल्या पराभवाची चर्चा जास्त होते. आता तुमच्यासारखा कार्यकर्ता असे म्हणू शकतो, की गावात सत्ता नाही, तालुक्यात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि प्रदेशाध्यक्षपद मात्र आहे.असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.