Jumbo Covid रुग्णालयात दादागिरी करणाऱ्यांची होणार चौकशी – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील कोरोना रुग्णांसाठी तयार केलेले जम्बो कोव्हीड हॅास्पीटलमध्ये दमदाटी करण्याच्या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. त्या हॅास्पिटलमध्ये महापालिकेतल्या माननीयांनी चक्क पालिकेच्याच डॅाक्टरला धमकावण्याचा प्रकार घडला होता. या कारणावरून त्रास झालेल्या डॅाक्टरला महापौरां पुढे डोळ्यातून अश्रू कोसळले होते. तर जम्बो मधल्या जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप केला जातोय, मात्र अशा अवस्थेत काम करायचं तरी कसं असा प्रश्न जम्बो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपस्थित केलाय.

जम्बो हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रकरणावरून चौकशी करणार असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे “ हा नेमका काय प्रकार आहे ते मला माहित नव्हतं. मात्र या प्रकरणाची पुर्ण चौकशी केली जाणार आहे. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. विभागीय आयुक्तांबरोबर याबाबत चर्चा करणार असल्याचे देखील पवार यांनी म्हटलं आहे.

या दरम्यान, जम्बो कोव्हीड सेंटर मध्ये जात महापालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी येथील डॅाक्टर आणि संचालकांना धारेवर धरले आहे. तर यामधील एका माननीयांची भाषा तर अशी होती की महापालिकेची समन्वयक डॅाक्टर म्हणून काम करणाऱ्या या महिलेला अक्षरश: रडु आले आहे. या सर्व प्रकाराची तक्रार घेवुन डॅाक्टरांनी थेट महापालिका गाठत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यातले एक माननीय हे वारंवार त्रास देत असल्याचा आरोप महिला डॅाक्टर ने केला होता. यानंतर महापालिकेकडुन चालवल्या जाणाऱ्या जम्बो हॉस्पिटलमध्ये जेवणाचे कॅान्ट्रॅक्ट मिळवण्यासाठीच हा सगळा प्रकार सुरु असल्याची चर्चा होत आहे. तसेच, सध्या १८० रुपयांनी जेवण मिळत असताना एका कार्यकर्तीला हे कॅान्ट्रॅक्ट ३०० रुपयांवर पाहिजे आहार. तर यावरून हा दमदाटी करण्याचा प्रकार येथे झाला आहे.