सावधान ! ‘या’ 8 पदार्थांचं सेवन किडनीसाठी अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शरीरातील प्रत्येक अवयव अत्यंत महत्वाचा आहे ज्यात किडनी तर आवश्यक आणि अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. किडनी खराब झाल्यास अनेक समस्या आणि आजार उद्भवू शकतात. शरीराचे आरोग्य शाबूत ठेवण्यासाठी किडनी अत्यंत महत्वाची आहे. परंतू चूकीच्या खाण्या – पिण्याच्या पद्धतीने किडणीवर विपरित परिणाम होतात. आजकाल किडनीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोणते पदार्थ किडनीसाठी धोकादायक आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे.

रेड मीट –
या मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते, ज्याचा आपल्या शरीरावर आणि मास पेशीवर चांगला परिणाम तर होतो परंतू किडनीसाठी हे घातक आहे. यात मोठ्या प्रमाणात फॅट असते जे किडनसाठी योग्य नाही. यामुळे शरीरात यूरीक असिड वाढते.

अल्कहोल –
जास्त दारु किंवा अल्कहोल किडनीला डॅमेज करते. जास्त दारु किडनीच्या फंक्शनला बदलते, ज्या विपरित परिणाम डोक्यावर होतो. अल्कहोलमुळे जास्त डिहाइड्रेटिंग होते तर किडनीबरोबर शरीराच्या इतर भागांना जास्त पाणी आवश्यक असते. जर थोडी दारु पिली तर त्यानंतर जास्त पाणी प्यावे.

मीठ –
मीठ ही मानवी जीवनातील अत्यंत आवश्यक घटक आहे. शरीरातील द्रव्य संतुलित ठेवण्यासाठी मदत करते, पोटेशियम बरोबर मिळून सोडियम आपल्या रक्ताला किडनीच्या माध्यमातून फिल्टर करतो, परंतू आपल्या जेवणात मीठाचे प्रमाण योग्य हवे, जास्त झाल्यास किडनीला अधिक पाण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे ब्लडप्रेशरचा धोका होऊ शकतो.

कॅफिन –
कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, लोक कायमच आळस झटकण्यासाठी कॉफी पितात. परंतू कॉफीचे शरीरातील प्रमाण कमी झाल्यास शरीरात रक्तदाबाचा धोका वाढतो आणि त्याचा किडनीवर घातक परिणाम होतो.

सोडा आणि एनर्जी ड्रिंक –
अनेकांना हे पेय पिणे अधिक आवडते आणि याने ऊर्जा देखील मिळते. परंतू हे पेय आरोग्यासाठी घातक आहेत. या पेयामुळे शरीराला कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारातून हे पेय दूर ठेवावेत. या पेयामध्ये मोठ्या प्रमाणात फॅफीन आणि साखर असते जी शरीराला घातक असते. ज्यात रंग आणि केमिकल देखील असतात, जे घातक असतात.

कृत्रिम स्वीटनर्स –
जे डायट पेयात आढळते. जे थेट साखरेला पर्याय म्हणून वापरले जाते. परंतू काही अहवालानुसार साखरेला हा पर्याय नाही परंतू त्या साखरेचे गुणधर्म असतात. हे फक्त आपल्या मेंदूला आदेश देण्यासारखे आहे की तुम्ही साखर खात आहात.

दुग्ध पदार्थ –
या पदार्थामध्ये कॅल्शियम आणि काही पोषक तत्व असतात, तसेच भरपूर प्रोटीन देखील असते. हे तुमच्या आहारात आवश्यक आणि फायदेशीर ठरते. परंतू याचे अधिक सेवन घातक ठरु शकते. कॅल्शियमचा परिणाम किडनीवर होतो. किडनीचा आजार असलेल्या लोकांना कमी प्रमाणात दुग्ध पदार्थ घ्यावे लागतात, त्यामुळे लगेचच डायलिसिसची गरज पडत नाही.

नॉन ऑर्गेनिक फूड –
डबाबंद पदार्थ शरीरासाठी घातक आहे. या पदार्थात पेस्टीसाइट्स असतात, जे किडनीला धोकादायक आहे. तर ऑर्गेनिक पदार्थामध्ये केमिकल्स किंवा पेस्टीसाइट्सचा वापर होतं नाही.

Visit : Policenama.com