‘या’ जीवघेण्या ‘मेहनती’नंतरच मिळतो ‘बलिदान बॅज’ ; जाणून घ्या, महेंद्रसिंह धोनीला का, कधी आणि कशामुळे दिला ‘बलिदान बॅज’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धोनीच्या क्रिकेट ग्लोव्हस वरील बलिदान बॅज प्रकरणीचा वाद चांगलाच विकोपास गेला आहे. या वादविवाद प्रकरणी बीसीसीआय ने आयसीसी च्या विरोधात माहीची पाठराखण देखील केली आहे. परंतु हा बलिदान बॅज नेमका काय आहे ज्याला मिळविण्याचे प्रत्येक सैनिकाचे स्वप्न असते. हा बॅज मिळविण्यासाठी अत्यंत कठीण मेहनत घेवून पॅराकमांडो चे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते ज्याबद्दल नुसता विचार करूनच अनेकांचा थरकाप उडेल. याबद्दल जाणून घ्या सविस्तर

‘पॅराकमांडो’ काय आहे :

भारतीय सैन्यदलातील सर्वाधिक घातक, अत्याधुनिक शस्त्रांबरोबरच शस्त्रांशिवायही शत्रूशी सामना करण्यास पॅराकमांडो सक्षम असतात. छातीवर मेडल्स, गुलाबी टोपी, त्यावर पॅराशूट रेजीमेंट चे चिन्ह आणि छातीवर बलिदान बॅज असा एका पॅराकमांडो चा रुबाब असतो. या स्पेशल फोर्समध्ये निवड होण्यासाठी प्रत्येक सैनिकाला पॅराट्रूपर्स चेजीवघेणे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.

कोण होऊ शकते प्रशिक्षणात सहभागी :

भारतीय सैन्यदलातील सैनिक या प्रशिक्षणासाठी रीतसर मागणी करू शकतात. यासाठी ३ महिन्यांचा प्रशिक्षणपूर्व कालावधी पूर्ण करावा लागतो ज्यामध्ये कित्येक प्रशिक्षणार्थी नापास देखील होतात. यामध्ये पास होणाऱ्या प्रशिक्षणार्थी सैनिकांना आग्रस्थित पॅराट्रूपर्स प्रशिक्षण केंद्रात पाठविले जाते. याठिकाणी त्यांना आकाशातून ५ उड्या माराव्या लागतात ज्यातील काही रात्रीच्या घनघोर काळोखात असतात.अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक चाचण्या पार पाडल्यानंतर इच्छुक प्रशिक्षणार्थींना आणखी ३ महिन्यांचे अधिकचे प्रशिक्षण असते. अशा प्रकारे ६ महिन्यांचे प्रशिक्षण असते.

असे असते खडतर प्रशिक्षण:

पॅराकमांडोंचे प्रशिक्षण जगातील सर्वाधिक कठीण प्रशिक्षण मानले जाते. यामध्ये सैनिकांना मानसिक आणि शारीरिक प्रकारचा त्रास दिला जातो. झोपू दिले जात नाही आणि जेवणही दिले जात नाही. जेवण नसताना आजूबाजूला मिळेल त्या गोष्टी खाऊन उदरनिर्वाह करावा लागतो. प्रचंड थकल्यानंतरही कसलाही आराम न करता काम करावे लागते.कित्येक सैनिक असे जीवघेणे प्रशिक्षण सोडून निघून जातात परंतु जे पूर्ण करतात त्यांना गुलाबी टोपी आणि अत्यंत मानाचा समजला जाणारा बलिदान बॅज दिला जातो.

काचेचा तुकडा देखील खातात हे कमांडो :

एवढेच नाही तर यानंतर प्रशिक्षणार्थींना काचेचा तुकडा देखील खायला लावला जातो. हि एक परंपरा आहे. यामुळे या सैनिकांना ‘ग्लास ईटर्स’ देखील म्हणतात. टोपी दिल्यानंतर सैनिकांना रम ने भरलेला ग्लास दिला जातो. यातील रम पिल्यानंतर दातांनी ग्लास चा तुकडा तोडून चावून खावा लागतो. त्यानंरच बलिदान बॅच दिला जातो.

धोनीला का,कधी आणि कसा दिला गेला बलिदान बॅच:

क्रीडा क्षेत्रातील विशेष कार्यामुळे धोनीला २०११ साली मानद लेफ्टिनेंट कर्नल ची रँक दिली गेली होती. कपिल देव नंतर हा सन्मान मिळविणारा धोनी केवळ दुसरा खेळाडू आहे. धोनी हा एक प्रशिक्षित पॅराट्रूपर आहे ज्याने हे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे.

धोनी 106 पैराशूट रेजिमेंट चा सदस्य आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये प्रशिक्षणासाठी पॅराट्रूपर बनल्यानंतर आग्र्याच्या प्रशिक्षण केंद्रात त्याने आपले प्रशिक्षण पूर्ण केले. भारतीय वायू सेनेच्या एएन-32 या विमानातून पाचवी उडी घेतल्यानंतर त्याने प्रतिष्ठित बलिदान बॅज लावण्याची अहर्ता मिळविली. यावेळी धोनीने तब्बल 1,250 उंचीवरून उडी मारली होती आणि एका मिनिटाच्या आत मालपुरा ड्रॉपिंग झोन येथे यशस्वीरीत्या उतरला होता.

धोनीला बनायचे होते सैन्यात अधिकारी:

धोनीला २०११ साली मानद लेफ्टिनेंट कर्नल च्या रँक ने सन्मानित केल्यानंतर त्याने ‘सैन्यात अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न होते परंतु नशिबाने क्रिकेटर झालो’ असे वक्तव्य केले होते.