कर्जाच्या ओझ्याखाली आहात तर ‘या’ 3 टिप्स तुम्हाला नक्की कामाला येतील, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या धकाधकीच्या जीवनात जास्त तर नोकरदार वर्ग कर्ज घेऊन आपल्या गरजा भागवताना दिसतो. पण समजा जर तुमच्याकडे भांडवल असेल तर आधी कर्ज फेडायचं की भांडवलाचा उपयोग करून आपल्या उत्पन्नात /गुंतवणुकीत वाढ करायची, असा प्रश्न अनेकांसमोर असतो. अशा वेळी नक्की काय करायचं हे आता पाहूया. आपण तीन मुद्द्यांमध्ये हे उपाय पाहणार आहोत.

१) कर्जाची परतफेड :
सर्वप्रथम कर्जाची परतफेड कशी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

जर आपण क्रेडिट कार्ड घेतले असेल आणि थकबाकी असेल तर प्रथम आपण त्याची थकबाकी भरली पाहिजे.

आपण कंज्यूमर ड्यूरेबल लोन,गृह कर्ज, कार कर्ज इ. घेतले असल्यास प्रथम हे कर्ज परत करा आणि नंतर गुंतवणूकीसाठी पैसे वाचवा.

कर्ज घेवून गुंतवणूक करु नये. प्रथम कर्जाची परतफेड करा आणि मग गुंतवणूक कशी आणि कुठे करणार या रणनीतीवर काम करा.

२) प्रथम गुंतवणूक करणार असाल तर
तुम्ही जर प्रथम गुंतवणूक करणार असाल तर एक गोष्ट तुम्हला माहीतच असेल की बँका गृहकर्जाचे व्याज दर दिवसेंदिवस कमी करीत आहेत आणि जर तुम्ही गृह कर्जाचा ईएमआय भरत असाल तर तुम्हाला कमी किंमतीवरही कर्ज परतफेड करण्याची संधी मिळेल आणि तुमचे घराचे भाडे देणे देखील वाचते. अशा लोकांसाठी हा सल्ला निश्चितच दिला जाऊ शकतो की त्यांना प्रथम गुंतवणूकीद्वारे चांगले उत्पन्न मिळेल आणि हळूहळू त्यांचे कर्ज परतफेड करता येईल.

३) गुंतवणूक आणि कर्जाचा ताळमेळ आवश्यक
गुंतवणुकीतून किती उत्पन्न येत आहे आणि कर्जाची किंमत याचा ताळमेळ बसवणे महत्त्वाचे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गुंतवणूकीवर परतावा मिळत आहे, कर्जाची परतफेड आणि कर्जाची किंमत यांच्यातील फरकांची तुलना करा आणि आपल्याला ज्या पर्यायात फायदा होईल तोच पर्याय निवडा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/