‘त्यांनी’ पालखी पुण्यात कधी येणार असे विचारणार्‍याचे ‘नाक’ फॅक्‍चर केलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – ते तिघे शिवदर्शन येथील हॉटेल गोल्डीमध्ये चहा पित होते, त्यावेळी तेथे आलेल्या त्यांच्या ओळखीच्या एकाने ‘पालखी पुण्यात कधी येणार आहे’, असे विचारले. त्याचा राग आल्याने त्या तिघांनी त्याला मारहाण केली. त्याच्या कानावर इतका जोरात ठोसा मारला की त्याच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले.

‘पालखी पुण्यात कधी येणार आहे’असे विचारल्यावर कोणाला राग येण्याचे कारण काय असे तुम्हाला वाटेल, तुम्हाला पडणारा प्रश्न बरोबर आहे. पण त्यांच्या मारहाणीमागचे कारण जाणून घेतले तर तुमच्या प्रश्नाचे निरासन होईल.

त्याचे काय आहे, की पुण्यात बुधवारी पालख्या येणार आहे. त्याच्या स्वागताची तयारी शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. पालखीबरोबर हौशेनवसे, गवसे येत असतात. त्याचबरोबर पालखीच्या गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरटे, पाकिटमारही येत असतात. ज्यांनी मारहाण केली़ त्यांना राग येण्याचे कारण म्हणजे, त्यांच्यावर पाकिटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मुद्दाम त्याने आपल्याला ‘पालखी पुण्यात कधी येणार’ हे मुद्दाम विचारल्याचा समज होऊन त्या तिघांनी त्याला मारले.

सनी सोनवणे (रा़ घोरपडी पेठ), सँडी नायर (रा़ गंज पेठ), अजय पटेल (रा़ पर्वती दर्शन) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी चेतन नवनाथ बाटे (वय ३०, रा़ पर्वती दर्शन) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

शिवदर्शन येथे हा प्रकार घडल्यानंतर तिघांनी चेतन बाटे याला पर्वती दर्शन येथील एस टी कॉलनीत रविवारी रात्री बोलावले. तो आल्यावर सँडी याने त्याच्या नाकावर ठोसा मारला. त्यात त्याचे नाक फॅक्चर झाले. या प्रकारानंतर तिघे पळून गेले असून दत्तवाडी पोलिसांनी तिघांचा शोध घेत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉँगटर्म’ फायदे

व्यायामानंतर ‘या’ ७ चुका टाळा ; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

गोडपदार्थ खाताना ‘ही’ काळजी घ्या आणि दातदुखीच्या समस्या टाळा

इंटरनेटचा अतिरेकी वापर करतो मेंदूच्या ‘या’ क्षमतांवर परिणाम