#Loksabha : उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित झालं आहे. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महायुती, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहणार आहेत. त्याबरोबरच आता तृतीयपंथीयांचा उमेदवार म्हणून प्रशांत वारकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे आता सातारा मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे.

आमच्या हक्कांसाठी मी निवडणूक रिंगणात  –

निवडणुकीत उभे राहण्याविषयी प्रशांत वारकर म्हणले की, ‘प्रस्थापित समाजानं आमचं अस्तित्व कायम नाकारलं. हाडामासाची माणसं असूनही केवळ आमच्या नैसर्गिक भावनांचा कौल ऐकून जगणंही समाजाला नको होतं. यातून गेल्या काही दशकांतील आमची लढाई यशस्वी झाली आणि आम्हाला कायद्यानेच स्वतंत्र अस्तित्व बहाल केले. कायद्याने दिलेले हे अस्तित्वही नाकारण्याचे अनुभव आम्हाला आले. कायद्याने तृतीयपंथीयांना स्वतंत्र नागरिकत्व बहाल केल्यानंतर आता विकासाची धोरणं बनविण्याच्या प्रक्रियेतही आमचा सहभाग असावा. त्यामुळे आमच्या हक्कांसाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचं मी ठरविलं आहे.’

देशाचं माहीत नाही, साताऱ्यात मीच जिंकणार’-

‘येत्या लोकसभा निवडणुकीत देशात काय होईल मला माहीत नाही, पण साताऱ्यात मीच जिंकणार,’ असा विश्वास साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवला आहे. ‘माझ्यावर कुणीही नाराज नाही. कारण माझ्याकडं येणाऱ्या प्रत्येकाचं मी काम करतो. ते करताना मी पक्ष बघत नाही. व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करतो,’ असंही उदयनराजे म्हणाले होते.

मागील काही काळापासून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. साताऱ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उदयनराजेंचा चाहता वर्ग आहे. विशेषतः त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईलचे जनताच नव्हे तर राजकीय पक्षातही चाहते आहेत. यामुळे त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक कोण कोण लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us