‘ही’अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नेंट ; दिसत आहे बेबी बंप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री आणि मॉडेल अ‍ॅमी जॅक्सन सध्या प्रेग्नेंट आहे. सध्या ती दुबईमध्ये असून ती प्रेगनन्सी पीरियड एन्जॉय करताना दिसत आहे. दुबई मध्ये सु्ट्टी एन्जॉय करत अ‍ॅमी पूर्ण वेळ स्वत:ला देत आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यात ती गोल्फ खेळताना दिसत आहे.

अ‍ॅमीचे वर्कआऊट करत असतानाचेही अनेक व्हिडीओ यापूर्वीच व्हायरल झाले आहेत. आता तिचा नवीन गोल्फ खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अ‍ॅमी ब्लॅक रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. या लुकमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.

अ‍ॅमी जॅक्सन तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानायिटून सोबत खूप वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. लग्नाआधीच ती प्रेगनंट आहे.