कटकट संपली ! रेल्वे प्रवासा दरम्यान ‘ओरिजनल’ IDची गरज नाही

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -भारतीय रेल्वेने तिकिटाशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केले आहेत.  रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना आता आयडी प्रूफची हार्ड कॉपी जवळ बाळगण्याची आवश्यकता  नाही.प्रवाशांना mAadhaar चा आयडी प्रूफ म्हणून वापर करता येणार आहे.  थोडक्यात  प्रवाशांना आयडी प्रूफचे मोबाइलच्या सहाय्याने वेरिफिकेशन करता येणार आहे.  IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासादरम्यान mAadhaar, eAadhaar, ड्राइविंग लायसन्स आता वैध आयडी प्रूफ म्हणून वापरता येणार आहेत.

आधार कार्डधारक आपल्या स्मार्टफोनमध्येच  mAadhaar अ‍ॅप डाउनलोड करू शकतो. या अ‍ॅपमुळे  स्मार्टफोनमध्येच आधार कार्ड  अ‍ॅक्सेस करता येणार आहे.  mAadhaar अ‍ॅपमध्ये आपले नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि फोटो देखील असणार आहे. याच्या आधारेच आयडी प्रूफ व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुलभ करेल.

हे अ‍ॅप सध्या Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, तथापि iOS वापरकर्त्यांना या अ‍ॅपसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. eAadhaar ही आधाराची पासवर्ड असणारी इलेक्ट्रॉनिक प्रत आहे. यावर  UIDAI ची  डिजिटल स्वाक्षरी आहे.  आधार कायद्यानुसार eAadhaar सुद्धा आधार कार्डच्या हार्ड कॉपी इतकेच वैध आहे.