PF अकाऊंटचा बॅलन्स जाणून घेण्यासाठी ‘ही’ आहे सोपी पद्धत, अशी वापरावी लागेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना काळात आर्थिक तंगीला तोंड देण्यासाठी देशातील असंख्य लोकांनी आपल्या प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) मधून पैसे काढले होते. परंतु, असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये किती पैसे शिल्लक आहेत याबाबत माहिती नसते. पीएफ अकाऊंटमधील सध्याची शिल्लक जाणून घेण्याची अतिशय सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही काही क्षणात आपल्या अकाऊंटमध्ये जमा रक्कम जाणून घेवू शकता.

* या नंबरवर मिस्ड कॉलने समजू शकतो बॅलन्स –

तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901046 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.

* एसएमएसने पीएफ बॅलन्स जाणून घ्या

तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.

10 भाषांमध्ये मिळेल एसएमएस सेवा
एसएमएसद्वारे आपण 10 भाषांमध्ये आपल्या पीएफ अकाऊंटची माहिती मिळवू शकता. उदाहरणार्थ जर तुम्हाला मराठीत माहिती हवी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला EPFOHO UAN MAR टाइप करावे लागेल आणि त्यानंतर 7738299899 वर मॅसेज पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून त्याच भाषेमध्ये एक मॅसेज येईल ज्यामध्ये तुमची सर्व डिटेल्स असेल. तर इंग्रजीत जाणून घेण्यासाठी कोणताही कोड टाइप करावा लागणार नाही.

या भाषांसाठी हे कोड टाइप करा
हिंदी – HIN
पंजाबी – PUN
गुजराती – GUJ
मराठी – MAR
कन्नड – KAN
तेलगु – TEL
तमिळ – TAM
मल्याळम – MAL
बंगाली – BEN