डॅनियल ‘असा’ पडला सनी लिओनीच्या प्रेमात, ‘या’ कारणामुळं त्यानं केलं ‘अ‍ॅडल्ट’ सिनेमात काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनीचा पॉर्न इंडस्ट्री ते बॉलिवूड असा एक मोठा प्रवास आहे. आज तिचं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान आहे. पॉर्न स्टारव्यतिरीक्तही तिचं आज वेगळं स्थान तयार झालं आहे. डॅनियलनं पॉर्न स्टार असलेल्या सनीसोबत लग्न कसं केलं असा प्रश्न अनकेांना पडला होता. याचा सनीनचं खुलासा केला आहे. इतकेच नाही डॅनियलनं पॉर्न मुव्हीत काम कसं केलं हेही तिनं सांगितलं आहे. सनीनं एका मुलाखतीत तिच्या लव लाईफबद्दल सांगितलं होतं.

सनी म्हणते, “वेगसमध्ये माझ्या एका जवळच्या मित्रामुळे डॅनियलच्या बर्थडे पार्टीत आमची ओळख झाली. आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. डॅनियलचं असं म्हणणं आहे की, तो पाहताक्षणीच माझ्या प्रेमात पडला होता. परंतु माझ्या मनात असं काहीच नव्हतं.”

‘असं अजिबात वाटत नव्हतं की, ती आमची पहिली डेट आहे’

सनीनं पुढं सांगितलं की, पार्टीत तिला पाहिल्यानंतर कुठूनतरी त्याला सनीचा नंबर आणि ईमेल आयडी मिळाला होता. सनी म्हणते, “त्यानं मला फोन करण्याऐवजी ईमेल केला. आमचं बोलणं सुरू झालं. यावेळी मी न्यूयॉर्कला जात होते. तिथे डॅनियल राहत होता. जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटायला गेले तेव्हा मी उशीरा पोहोचले होते. पहिल्या डेटवर त्यानं मला खास ट्रीटमेटं दिली. त्यावेळी आम्ही तब्बल 3 तास एकत्र घालवले. आमच्याकडे पाहिल्यानंतर असं अजिबात वाटत नव्हतं की, ती आमची पहिली डेट आहे.”

म्हणून डॅनियल करायला लागला पॉर्न मुव्हीत काम

सनी सांगते की, “मी कोणासोबत अ‍ॅडल्ट सिनेमात काम केलेलं त्याला आवडत नव्हतं. त्यामुळे त्यानं स्वत:च माझ्यासोबत काम करायला सुरुवात केली. यानंतर आम्ही दोघांनी एक कंपनी सुरू केली. काही दिवसांनी माझ्या आईचं निधन झालं. तेव्हा पासून डॅनियलनं मला कायम साथ दिली आहे. आजही तो माझ्यासोबत ठाम उभा आहे.”