हे ‘दारू दुकान’ नव्हे तर ‘पोलीस ठाणे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहसा पोलीस ठाण्यात कोणी जात नाही़ मात्र, या पोलीस ठाण्याच्या शेजारुन जाणाऱ्यांना चक्क ठाण्यातूनच दारुचा उग्र दर्प जाणवत होता. पोलीस ठाण्यातूनच दारुचा वास येत असल्याने कुतुहूल म्हणून ते आत डोकावून पहात होते. तेव्हा आतले दृश्य पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावार रहात नव्हती.

तेथे वेगवेगळ्या देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. पोलीसच ठाण्यातील एका खोलीत पडलेल्या दारुच्या बाटल्या बाहेर आणून ठेवत होते. त्यामुळे चर्चा सुरु झाली. शेवटी या सर्व गेल्या ९ वर्षात विविध छाप्यात जप्त केलेल्या दारुच्या बाटल्या असून त्या नष्ट केल्या जात असल्याचे समजल्यावर या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

मात्र, या प्रकाराने दौंड पोलीस ठाण्याच्या परिसरात तो चर्चेचा विषय झाला होता. बेकायदा दारू व्यवसायातून जप्त करण्यात आलेल्या साधारणत: ९ वर्षांपासून या दारूच्या बाटल्या पोलीस ठाणे परिसरातील महसूल खात्याच्या एका रूममध्ये होत्या. दारूबंदी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांची खोकी बाहेर काढण्यात आली.

देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे जणू काही पोलीस ठाण्याच्या परिसरात दारूचे दुकान आहे की काय, असे एकंदरीत चित्र निर्माण झाले होते. परंतु या जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या आहेत, असा निर्वाळा होताच नागरिकांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मंगळवारी सायंकाळी दारूबंदीचे अधिकारी आणि दौंड पोलीस यांनी एकत्रितरीत्या एका ड्रममध्ये सर्व बाटल्यांमधील दारू ओतून ही दारूनष्ट केली़ काही लाख रुपयांची ही दारु होती.

आरोग्य विषयक वृत्त

‘केस’ धुताना घ्या ही काळजी

मधुमेहामुळे पाय गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी ‘ही’ काळजी अवश्य घ्या

तोंडाच्या कॅन्सरपासून संरक्षण करणारे भारतीय उत्पादन ‘स्वर्णसाथी’

नेहमीच जेवणावर ताव मारत असाल तर होऊ शकतो ‘हा’ त्रास