‘या’ मंत्र्यास पुन्हा एकदा कोरोनाने घेरले

पोलीसनामा ऑनलाईन – राज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती स्वत: त्यांनी ट्विट करुन दिली आहे. यामध्ये माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील बच्चू कडू यांनी केले आहे.

बच्चू कडू दिल्लीतील शेतकरी आंदोनलनामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी अमरावती ते दिल्ली असा दुचाकीवरुन प्रवास केला होता. गेल्या काही दिवसांमध्ये कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर परत आता त्यांना कोरोनाचा लागण झाली आहे. मात्र त्यांची तब्बेत स्थिर असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.