‘त्या’ मृतदेहाचे गुढ उकलले युनीट तीनने

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वारजे माळवाडी येथे स्मशानभूमीजवळ सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात गुन्हे  शाखेच्या युनीट तीनच्या पथकाला यश आले आहे. भाचीची छेड काढत असल्याने व पैशाच्या देवाणघेवाणीवरून असलेल्या  वादातून दोन जणांनी त्याला दारू पाजून खून  केला. त्यानतंर टेम्पोमध्ये मृतदेह घेऊन वारजे पुलावरून नदीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे व सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी दिली.

इर्शाद महंमद शेख (२८, काळेवाडी), सोमनाथ उर्फ सोमा पांडूरंग थोरात (२७, काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर कृष्णा गिरीष सोनवणे (२२, काळेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरातील  स्मशानभुमीजवळ असलेल्या नदी पात्रात एका  अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच्या शरीरावर असलेल्या खुनांवरून त्याचा मारहाण करून खून केला असल्याचे समोर आले. त्यानंतर वारजे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे  शाखेच्या युनीट तीनचे पथक तपास करत असतांना सहायक पोलिस फौजदार अनिल शिंदे, पोलिस हवालदार प्रविण तापकिर यांना मृतदेह हा वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे असल्याचे आढळून आले. त्यांनी नातेवाईकांकडून त्याची  ओळख पटविली. तेव्हा तो कृष्णा सोनवणे याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता तो विकास उत्तरेकर यांच्या घरातून इर्शाद शेख व सोमनाथ थोरात याच्यासोबत गेला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर कृष्णा सोनवणे हा सोमा थोरात याच्या भाचीची छेड काढत असल्याने व इर्शाद शेख याच्याशी पैशांच्या देवाणघेवाणीवरून शिवीगाळ करत असल्याने दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानंतर त्याला दारू पिण्यासाठी रावेत येथे नेऊन तो दारूच्या नशेत असताना गळा दाबून बेशुद्ध केले व डोक्यात दगड घालून खून केला.. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो टेम्पोमध्ये नेऊन वारजे येथील पुलावरून खाली  फेकून दिला.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक निकम, अजय म्हेत्रे, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस फौजदार अनिल शिंदे, किशोर शिंदे, दत्तात्रय गरूड, दीपक मते, प्रविण तापकिर, मेहबुब मोकाशी, रामदास गोणते, संतोष क्षीरसागर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन गणबोटे, विल्सन डिसोजा, संदीप राठोड, अतुल साठे, कैलास साळुंके, कल्पेश बनसोडे यांच्या पथकाने केली.