प्रेग्नंट असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा मोहक फोटो सोशलवर होतोय VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंट आहे. प्रेग्नंट असणाऱ्या समीराचा एक फोटो समोर आला असून सध्या व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच समीराने प्रेग्नंसी फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहली होती. ही पोस्ट व्हायरल झाली होती. 2015 मध्ये आई झालेली समीरा आपला दुसरा बेबी एक्स्पेक्ट करत आहे. पु्न्हा एकदा समीरा आपला प्रेग्नंसीचा फोटो शेअर करत चर्चेत आली आहे.

सध्या व्हायरल होणारा समीराचा हा फोटो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की समीरा आपल्या मुलासोबत समुद्रकिनारी उभी आहे. आपल्या मुलाचे हात पकडत तिने ते आपल्या बेबी बंपवर ठेवले आहेत. तिने प्रेग्नंसीतील खास वनपीस घातला आहे. दोघांचा फोटो खूपच मोहक दिसत आहे. समीराच्या चाहत्यांना तिचा हा फोटो विशेष आवडल्याचे दिसत आहे.

समीराच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोचे खूपच कौतुक केले आहे. अनेकांनी फोटोवर कमेंट केली आहे. सू्र्य मावळतानाचे हे खास दृश्य चाहत्यांचे मन जिंकत आहे. निसर्गाच्या विविध रंगाचेही या फोटोतून दर्शन होत आहे. अतिशय मोहक असा हा नजारा दिसत आहे. त्यातच तिचे आणि मुलाचे प्रेम दिसत आहे. समीराने या फोटोला खास कॅप्शनही दिले आहे जे या फोटोला साजेसं असं आहे.