‘ते’ 12 पोलिस अधिकारी, कर्मचारी निलंबनातुन मुक्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे पोलिस आयुक्‍तालयाच्या आस्थापनेवर असलेल्या 12 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबनातुन मुक्‍त करण्यात आले आहेत. त्याबाबतचा निर्णय पोलिस आयुक्‍तालयात दि. 11 सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. दि. 31 ऑगस्ट अखेर पर्यंत पुणे पोलिस आयुक्‍तालयाच्या आस्थापनेवरील तब्बल 55 जण निलंबीत आहेत. त्यावर चर्चा करून 12 जणांवरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली असून त्यांना सेवेत पुनःस्थापित करण्यात आले आहे.

लाच मागणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल विरुध्द गुन्हा दाखल

निलंबनातुन मुक्‍त करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात पुर्वीचे नेमणुकीचे ठिकाण ते सध्याच्या नेमणुकीचे ठिकाण पुढील प्रमाणे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप संभाजी कार्वेकर (भोसरी पो.स्टे. ते नियंत्रण कक्ष), पोलिस उपनिरीक्षक दिनेश वसंतराव सपकाळे (बिबवेवाडी पो.स्टे. ते नियंत्रण कक्ष), पोलिस उपनिरीक्षक बसवराज धोंडाप्पा चिट्टे (हिंजवडी पो.स्टे. ते नियंत्रण कक्ष), महिला उपनिरीक्षक सुरेखा लक्ष्मण कलगुटगी (बिबवेवाडी पो.स्टे. ते नियंत्रण कक्ष), सहाय्यक उपनिरीक्षक संतोष जगन्‍नाथ गायकवाड (बिबवेवाडी पो.स्टे. ते कोर्ट कंपनी, आरोपी पार्टी), पोलिस हवालदार रमेश ढमढेरे (मुंढवा पो.स्टे. ते कोर्ट कंपनी, आरोपी पार्टी), हवालदार रमेश जनार्दन काळे (हडपसर पो.स्टे. ते कोर्ट कंपनी, आरोपी पार्टी), महिला कर्मचारी प्रियंका ए. वाघ (विमानतळ पो.स्टे. ते कोर्ट कंपनी, आरोपी पार्टी), हवालदार सोहनलाल नानुराम चुटेले (कोरेगाव पार्क वाहतुक विभाग ते कोर्ट कंपनी, आरोपी पार्टी), लिपीक अशोक तुकाराम कुदळे (नोंदणी शाखा ते पोलिस आयुक्‍त कार्यालय), कर्मचारी अशोक विलास ढावरे (मुख्यालय ते कोर्ट कंपनी, आरोपी पार्टी) आणि महिला पोलिस हवालदार अलका गजानन इंगळे (दिघी पोलिस स्टेशन ते कोर्ट कंपनी, आरोपी पार्टी).

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B01FM7GGFI,B0756RCTK2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fb3706a7-b71a-11e8-b409-796b9062df58′]
वरील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांची न्यायालयीन/विभागीय शिस्तभंग विषयक कारवाई पूर्ण होईपर्यंत राजीनामा, स्वेच्छा निवृत्‍ती तसेच रूग्णता निवृत्‍ती घेता येणार नाही. निलंबन कालावधी गुन्हयाचा निकाल/विभागीय चौकशी/शिस्तभंग विषयक कार्यवाहीचा निर्णय झाल्यानंतर नियमित करण्यात येणार आहे. 12 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवरील निलंबन हे निलंबन आढावा समितीच्या मान्यतेने रद्द करण्यात आले आहे.