गांधी-वाड्रा घराण्याकडून ‘पारिवारिक भ्रष्टाचार’ : भाजपकडून हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ७० वर्षात संस्थागत भ्रष्टाचार ही देशाला कॉंग्रेसची देण आहे. मागील २४ तासात वेगवेगळ्या माध्यमांनी जनतेसमोर ठेवलेल्या तथ्यांवरून गांधी-वाड्रा परिवाराकडून पारिवारिक भ्रष्टाचार सुरु असल्याचं वास्तव समोर आलं आहे. राहूल गांधी डिफेन्सच्या व्यवहारात एवढी रुची घेण्यात देशहित नसून कौटुंबिक हितसंबंध आहेत. असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत. संजय भंडारी, एच. एल. पाहवा यांच्यासोबत जीजा साला यांचा काय संबंध आहे. याचे उत्तर राहूल गांधींनी देशाला द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन स्मृती इराणी यांनी राहूल गांधी आणि कॉंग्रेसवर घणाघात केला आहे. राहूल गांधी, प्रियंका गांधी  आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

इडीने एच. एल. पाहवा यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काही कागदपत्रे मिळाली आहेत. जमीनीच्या खेरदीसंदर्भात असलेल्या कागदपत्रांवरून पाहवा यांच्याशी राहूल गांधींचा आर्थिक संबंध दिसून येतो. हरियाणात राहूल गांधींनी पाहवा यांच्याकडून जमीन खरेदी केली. यात महेश नागर यांनी मध्यस्थी केली आहे. महेश नागर यांनी वाड्रा यांच्यासाठी हरिय़ाणा आणि राजस्थानात जमीनी खरेदी केल्या होत्या. या जमीनींबाबत रॉबर्ट वाड्रांची चौकशी सुरु आहे. यात प्रियंका वाड्रा यांचाही संबंध आहे. येथे श्रीमती वाड्रा यांच्याशी संबंधित दस्त ऐवज मिळाले आहेत. एच. एल. पाहवाकडे जमीन खरेदी करण्यासाठी पर्याप्त पैसे नव्हते. त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी पैसे सी. सी. थम्पी यांनी दिले आहेत. सी.सी. थम्पी, रॉबर्ट वाड्रा आणि संजय भंडारी यांची मैत्री आहे. युपीएच्या काळात पेट्रोलियम आणि संरक्षण संबंधित व्यवहारांमध्ये संजय भंडारी आणि सी. सी. भंडारी यांचे संबंध आहेत. या दोन्ही व्यवहारांच्या चौकशीचे धागे रॉबर्ट वाड्रापर्यंत जातात, यात मेहूणे राहूल गांधींचाही सहभाग आहे.

ह्याही बातम्या वाचा –

 

पालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?

मोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा !

You might also like