वकिलाला धमकीचे पत्र आल्याने जिल्हा न्यायालयात खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा न्यायालयात मंगळवारी सकाळी कामकाज सरु होण्याअगोदरच वकिलाला एका निनावी व्याक्तिने पाठविलेल्या धमकीच्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली.

जिल्हा न्यायालयाच्या टपाल पेटीत एक निनावी पञ आले. ते पञ पाहिल्यानंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. पत्रात लिहिलेल्या मजकूरावरून ते पञ एका अज्ञात व्यक्तींने पाठविल्याचे लक्षात आले. ते पत्र वकिल कुदंन पवार यांच्या नावे पाठवण्यात आले होते.

“कुंदन पवार तु ३०२ खटल्याचे काम पाहतो, तुला पाहून घेईन” असे त्या निनावी धमकिच्या पत्रात लिहिलेले होते. या धमकी पत्राचा वकिल संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. दुपारी जिल्हा बार असोशिएशन च्या वतीने तातडीची बैठक बोलावून पोलीस प्रशासनाला धमकी पत्राबाबत माहिती देण्यात आली.

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे