प्रसिद्ध चितळे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’; 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध चितळे (Chitale) यांच्या दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’ (Blackmail) करून,
20 लाख रुपयांची खंडणी (Ransom) उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
तर तिघे फरार आहेत. 2 ते 17 जून या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

करण सुनिल परदेशी (वय 22), सुनील बेन्नी परदेशी (वय 49) अक्षय मनोज कार्तिक (वय 27) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
तर पुनम सुनिल परदेशी (वय 27) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नामदेव बाबुराव पवार (वय 62) यांनी बिबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चितळे यांचे दूध उत्पादनाच्या शहराचे मॅनेजमेंट पाहतात.
दरम्यान, 2 जूनला पुनम परदेशी यांनी बी.जी चितळे ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे ई-मेल द्वारे चितळे दुधात काळा रंगाचा पदार्थ आढळल्याबाबत तक्रार केली होती.
त्यानंतर इतर आरोपींनी हे प्रकरण लवकर मिटवा, नाहीतर तुमचे दुकान बंद पाडू, तुमची बदनामी करू अशी धमकी देत खंडणीची मागणी केली.

त्यानंतर गेल्या पंधरा दिवसात  फिर्यादी यांच्याकडून त्यांनी 20 लाख रुपये खंडणी उकळली. बदनामीच्या भीतीने कंपनीने वीस लाख रुपये दिले होते.
दरम्यान, आरोपी त्रास देत असल्याने व असा काही प्रकार नसल्याने याप्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार दिली. त्यानुसार बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.
अधिक तपास उपनिरीक्षक थोरात हे करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web title :  Three booked for blackmailing Chitale management officials claiming to find black substance in the milk

हे देखील वाचा

18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

Pune News | गावकर्‍यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत

नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?’