मागे येणाऱ्या क्रेनची धडक बसून दुचाकीवरील तीन तरुणींचा मृत्यू

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाईन 

वेगाने मागे येत असलेल्या क्रेन धडक मागून येणा-या दुचाकीला बसून त्यात तीन तरुणींचा मृत्यू झाला. नागपूरमधील अंबाझरी टी पॉईंटवर आज सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.

अंबाझरी टी पॉईंट इथे मेट्रोचे काम सुरु आहे. या कामामुळे आजूबाजूचा परिसर अरुंद झाला असून रस्त्यावर खड्डेही प्रचंड झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास तिथे असलेली क्रेन क्लिनरशिवाय रिव्हर्स येत होती. तर तीन तरुणी दुचाकीवरुन ट्रिपल सीट येत होत्या. यावेळी वेगाने मागे आलेल्या क्रेनने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तिन्ही तरुणी क्रेनच्या खाली आल्या. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर एका तरुणीने हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचा मृत्यु झाला. या महाविद्यालयीन तरुणी असल्याची माहिती मिळत आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a88d6f54-9f88-11e8-81e1-131f4c1ee6a8′]
या अपघाताने परिसरात मोठा जमाव जमला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.