Coronavirus : ‘या’ कारणामुळं भारतातील 10 पैकी 3 कोविड रूग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा ‘डोनेट’,जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात डॉक्टरांच्या समोर एक नवीन अडचण निर्माण झाली आहे. देशात प्रत्येक 10 पैकी 3 कोविड रूग्ण प्लाझ्मा डोनेशन करण्यास लायक नाहीत. कारण त्यांच्या शरीरात योग्य मात्रेत न्यूट्रीलायजिंग अँटीबॉडीजच तयार होत नाहीत. जोपर्यंत शरीरात योग्य अँटीबॉडीज तयार होणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या शरीरातून प्लाझ्मा घेता येणार नाही.

खुलासा करण्यात आला आहे की, भारतातील पहिल्या कोवॅलसेंट प्लाझ्मा बँकेने इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्सेसमधील पहिल्या कोवॅलसेंट प्लाझ्मा बँकेच्या डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही कुणालाही प्लाझ्मा डोनेशनसाठी नकार देत नाही. परंतु, रूग्णांना दोन आठवडे आराम केल्यानंतर प्लाझ्मा डोनेशन करण्यासाठी सांगत आहोत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आयएलबीएसचे डॉ. एसके सरीन यांनी सांगितले की, रूग्णांमध्ये न्यूट्रीलायजिंग अँटबॉडीज योग्य मात्रेत तयार न झाल्यास आम्ही त्यांना दोन आठवड्यांनी पुन्हा बोलावू. असे यासाठी केले जाते की, रूग्णाच्या शरीरात योग्य मात्रेत अँंटीबॉडीज तयार व्हावेत.

अमेरिकेच्या एफडीएनुसार सामान्यपणे शरीरात न्यूट्रीलायजिंग अँटीबॉडीज कमीतकी 1:160 असले पाहिजे, जेणेकरून प्लाझ्मा डोनेट करता येईल. एक्सपर्ट म्हणतात, जर कोणताही पर्याय नसेल तर 1:80 च्या स्तरावर सुद्धा प्लाझ्मा डोनेशन करू शकता. परंतु, असे करणे नुकसानकारक असते. 10 पैकी 3 रूग्णांच्या शरीरात 1:160 पेक्षा कमी अँटीबॉडीज आहे.

काही कोविड रूग्ण तर या स्थितीत आहेत की, त्यांच्या शरीरात 1:40 न्यूट्रीलायजिंग अँटीबॉडीज आहेत. हा स्तर इतका कमी आहे की, त्यांच्या प्लाझ्मा डोनेशनबाबत बोलूही शकत नाही. त्यांना दुसर्‍यांदा कोरोना संसर्गाचा धोका असू शकतो.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अँटीबॉडीचे शरीरात इतके कमी प्रमाण असल्याने रूग्ण पुन्हा संक्रमित होऊ शकतात. परंतु, हे एक आव्हान आहे. अजून पर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी शरीरात अँटीबॉडीजची किती मात्रा हवी.

जेव्हापासून आयएलबीएसमध्ये प्लाझ्मा बँक उघडण्यात आली आहे, तेव्हापासून त्यामध्ये 250पेक्षा जास्त युनिट्स जमा केले आहेत. सध्या इतक्या युनिट्सने काम चालू शकते. अनेक रूग्णांची कोवॅलसेंट प्लाझ्मा थेरेपी करता येऊ शकते.

प्रत्यक्षात कोवॅलसेंट प्लाझ्मा ट्रीटमेंट ही वैद्यकीय उपचार शास्त्रातील खुप बेसिक टेक्नीक आहे. सुमारे 100 वर्षांपासून याचा उपयोग संपूर्ण जग करत आहे. यामुळे लाभ होतो आणि कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये सुद्धा लाभ दिसून येत आहे.

हे टेक्नीक विश्वासार्हसुद्धा आहे. शास्त्रज्ञ जुन्या रूग्णांच्या रक्ताद्वारे नव्या रूग्णांचा उपचार करतात. आजारातील जुन्या रूग्णांचे रक्त घेऊन त्यामधून प्लाझ्मा काढण्यात येतात. नंतर याच प्लाझ्मा दुसर्‍या रूग्णांच्या शरीरात टाकले जाते.

मनुष्याच्या रक्तात सामान्यपणे 55 टक्के प्लाझ्मा, 45 टक्के लाल रक्तपेशी आणि 1 टक्के सफेद रक्तपेशी असतात. प्लाझ्मा थेरेपीमुळे फायदा हा आहे की, वॅक्सीनशिवाय रूग्णात कोणत्याही आजाराशी लढण्याची क्षमता विकसित होते.

यातून वॅक्सीन बनवण्यासाठी वेळदेखील मिळतो. तात्काळ वॅक्सीनचा खर्चही येत नाही. प्लाझ्मा शरीरात अँटीबॉडीज बनवतो. सोबतच आपल्यात स्टोर सुद्धा करतो. जेव्हा हे दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात टाकले जाते तेव्हा तिथे जाऊन अँटीबॉडी तयार करते. असे करून अनेक व्यक्ती कोणत्याही व्हायरसच्या हल्ल्याशी लढण्यास तयार होतात.