खून प्रकरणात न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन
मागील काही दिवसापूर्वी तडीपार गुंड कैलास गायकवाड याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी कैलास पिटेकर हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला होता. मात्र आता हा दावा फोल ठरला आहे.  पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शाहूपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अल्पवयीन मुलांना पुढे करुन गैरकृत्य करणाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे. कैलास शंकर पिटेकर, सर्जेराव शंकर पिटेकर, आणि शंकर लक्ष्मण पिटेकर (रा. सर्वजण नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहे.
[amazon_link asins=’B07B4J65WB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c15dd40-8f3b-11e8-a379-5ff7e3e1c075′]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 जुलै रोजी कैलास गायकवाड या तडीपार असलेल्या गुंडाचा अर्कशाळेजवळ खून झाला होता. या घटनेनंतर परिसरासह शहरात खळबळ उडाली होती. तडीपार गुंडाचा खून कैलास पिटेकर याने केला असल्याचा आरोप मृत कैलास गायकवाड याच्या कुटुंबियांनी केला होता. तसेच त्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे गतीमान करुन कैलास पिटेकर याच्यासह त्याच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात घेतले. कैलास पिटेकर हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्यासह कुटुंबियांनी केल्याने पोलिसांसमोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c9bc0a2-8f3b-11e8-abe1-7bbff9e24eb5′]
संशयित अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आल्याने पोलिसांनी 10 दिवसापूर्वी त्यानुसार कारवाई केली. मात्र पोलीस निरीक्षक  किशोर धुमाळ यांनी याचा पाठपुरावा करुन कागदोपत्री माहिती घेतली असता कैलास पिटेकर हा अल्पवयीन नसल्याचे समोर आले. अखेर त्यानुसार सोमवारी रात्री पोलिस ठाण्यात त्याच्यासह एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aab34e05-8f3b-11e8-9aa0-4ddaf3d905d0′]