संगमनेरमध्ये तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाईन – अंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील मंगळापूर गावाजवळील प्रवरा पात्रात आज (शनिवार) दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

समर्थ दीपक वाळके ( वय – १०), रोहित चंद्रकांत वैराळ ( वय ११), वेदांत विनोद वैराळ ( वय-९) अशी मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे मंगळापूर गावावर शोककळा पसरली आहे.

मंगळापूर गावाजवळ प्रवरा पात्रात आज दुपारी मृत शाळकरी मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने मुले बुडाली. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी पात्राजवळ गर्दी केली होती. मुलाचे मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत. मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आली आहेत. या घटनेमुळे संपुर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

खिडकीतून उडी मारून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या
मुंबई : राहत्या घराच्या खिडकीतून एका अल्पवयीन मुलीने उडीमारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताडदेव येथे घडली आहे. या मुलीने शुक्रवारी (दि.२६) रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान खिडकीतून उडीमारुन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. प्रियंका अमरिष कोठारी (वय-१६) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. प्रियंका कोठारी हि आपल्या कुटुंबासमवेत ताडदेव येथील इम्पिरियल टॉवरमध्ये राहते. या टॉवरमध्ये रुम नंबर २३०८ मध्ये हे कोठारी कुटुंब राहते. शुक्रवारी रात्री प्रियंकान  याच रुमच्या खिडकीतून खाली उडी मारुन आपले जीवन संपवले. प्रियंकाला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच ताडदेव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी चौकशी केली मात्र तिने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. ताडदेव पलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.