Thyroid And Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड आणि थायरॉईडच्या रूग्णांनी ‘या’ एका भाजीपासून राहावे दूर, जाणून घ्या काय खाणे ठरू शकते धोकादायक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Thyroid And Uric Acid | निष्काळजीपणाची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक लोक थायरॉईड आणि यूरिक अ‍ॅसिड (Thyroid And Uric Acid) च्या आजाराने त्रस्त आहेत. पूर्वी जिथे फक्त वृद्धांनाच युरिक अ‍ॅसिड आणि थायरॉईडचा त्रास होत होता, तर आज तरुणांनाही या आजाराने ग्रासले आहे.

 

पुरुषांपेक्षा स्त्रियांना थायरॉईड रोग (Thyroid Disease) होण्याचा धोका दुप्पट असतो. 18 ते 35 वयोगटातील महिलांनी, विशेषतः गरोदर महिलांनी (Pregnant Women) थायरॉईड आजारापासून दूर राहण्यासाठी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. थायरॉईड ग्रंथीतून बाहेर पडणारा थायरॉक्सिन हा हार्मोन (Thyroxine Hormone) मानवी क्रियांसाठी मर्यादित प्रमाणात आवश्यक आहे.

 

त्याच वेळी, रक्तातील यूरिक अ‍ॅसिड हे एक प्रकारचे रसायन आहे, जे शरीरातील प्युरिन नावाच्या प्रथिनांच्या विघटनाने तयार होते. मूत्रपिंडांद्वारे फिल्टर केल्यानंतर बहुतेक यूरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर फेकले जाते, परंतु जेव्हा मूत्रपिंड हे टाकाऊ पदार्थ फिल्टर करू शकत नाही, तेव्हा ते यूरिक अ‍ॅसिड क्रिस्टल्सच्या रूपात तुटते आणि हाडांमध्ये गोळा होते, ज्यामुळे संधिरोग होतो. अशा स्थितीत थायरॉईड आणि युरिक अ‍ॅसिड टाळण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. (Thyroid And Uric Acid)

फ्लॉवर आणि कोबी (Cauliflower and Cabbage) :
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थायरॉइडच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी कोबी आणि फ्लॉवरचे सेवन कमी किंवा अजिबात करू नये. याशिवाय या रुग्णांसाठी ब्रोकोलीही धोकादायक ठरू शकते.

 

या हिरव्या भाज्यांमध्ये गॉयट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. हा घटक शरीरात थायरॉइडला चालना देण्याचे काम करतो.
याशिवाय या भाज्यांमध्ये असलेले फायबर थायरॉईडच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते.

 

यूरिक अ‍ॅसिड जास्त असलेल्या रुग्णांनी कोबी आणि मशरूमचे सेवन करू नये. या दोन्ही भाज्यांमध्ये भरपूर प्युरीन असते,
त्यामुळे युरिक अ‍ॅसिड जास्त असलेल्या रुग्णांनी या दोन भाज्यांचे सेवन टाळावे.
यूरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी कोबी आणि मशरूमच्या भाज्या खाणे टाळावे, असा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात.

 

थायरॉईडच्या रुग्णांनी कॉफी आणि ग्लूटेनयुक्त पदार्थ टाळावेत, तर युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी लाल मांस,
राजमा, मटार आणि हाय प्रोटीन डाएट घेणे टाळावे, विशेषत: ज्यामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते.

 

Web Title :- Thyroid And Uric Acid | uric acid and thyroid patients should keep distance from this one vegetable know what food can be dangerous AS

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PPF Calculator | ‘या’ खास ट्रिकने पीपीएफमध्ये जमा करा पैसे ! व्हाल 1.5 कोटीचे मालक, जाणून घ्या कॅलक्युलेशन

Omicron Covid Variant | तिसर्‍या डोससाठी बुक करावा लागणार नाही ‘स्लॉट’, असा घेऊ शकता डोस; मुलांबाबत व्हॅक्सीन कंपनीने दिला ‘हा’ इशारा

Pune Crime | खराडीत 2 कुटुंबात झाली हाणामारी, 7 जणांवर गुन्हा ! भांडणामागचे कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण