‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी ‘मंत्रपठन’ करा : दलाई लामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरसनं चीनसहित अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. असे असतानाच आता या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी बौद्ध भिक्खू आणि तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी मंत्रोच्चार करण्याचा सल्ला दिला आहे. चीनमधील बौद्ध अनुयायांनी मंत्राचं पठन करवं असं त्यांनी सांगितलं आहे. चीनमध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 100 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. याशिवाय अनेक लोक असे आहेत जे संक्रमित आहेत.

कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता दलाई लामांच्या अनुयायांनी फेसबुकवरून यापासून बचाव करण्यासाठी उपाय सुचवण्याचा आग्रह केला. त्यांचा आग्रहानंतर दलाई लामांनी अनुयायांना मंत्रपठनाचा सल्ला दिला. सर्व अनुयायांना त्यांनी ‘ओम तारा’ मंत्राचं पठन करण्यास सांगितलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा मंत्र सर्वात प्रभावी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी दलाई लामा यांनी शांत चित्तानं ‘ओम तारे तुत्तरे तरे स्वाहा’ या मंत्राचं पठन करण्यास सांगितलं आहे. यासोबत त्यांनी या मंत्राची एक व्हाईस क्लीपही शेअर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये गेल्या 24 तासांत 1300 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 106 लोकांचा मृत्यू झाला आहेत. भारतातही शेकडो लोकांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत एक हजार लोकांची थर्मल स्किनिंग करण्यात आली आहे. विमानतळांवरही प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू आहे. भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा