Tiger Shroff | टायगर श्रॉफला पाहून तरुणीला आली चक्कर, अशी फॅन कुठेच पाहिली नसेल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांची (Bollywood Actors) एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. त्यांना बघायला मिळावं म्हणून चाहते तासन् तास गर्दीमध्ये उभे राहतात. त्यांची फक्त एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या लाडक्या कलाकाराची एक झलक पहायला मिळावी. त्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा सध्या ‘हीरोपंती 2’ (Heropanti 2) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये (Movie Promotion) व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान टायगर श्रॉफला (Tiger Shroff) एक अनोखा अनुभव आला. त्याच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात एक तरुणी त्याला पाहून बेशुद्ध झाली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे.

 

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) यांनी नुकतंच त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन मुंबईमध्ये केलं. यावेळी या दोघांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी टायगरची एक चाहती त्याला पाहून अचानक बेशुद्ध झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक त्या मुलीला आधार देताना आणि पाणी प्यायला देत आहेत. त्यानंतर टायगरने स्वत: तिला स्टेजवर बोलवलं आणि प्रेमान आलिंगन देऊन विचारपूस केली. व्हिडीओमध्ये तो तिच्या डोक्यावर हात फिरवून तिची आपुलकीनं चौकशी करताना दिसत असून त्याच्या या कृतीने उपस्थित असलेल्यांची मनं त्याने जिंकून घेतली.

 

 

युजर्सकडून टायगरवर कौतुकाचा वर्षाव

टायगरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर अनेक युजर्सनी त्यावर कमेंट केले आहे. काही नेटकऱ्यांनी टायगरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काहीजण मजेदार कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये ‘बच्ची हो क्या’ हा टायगर श्रॉफचा डायलॉग लिहिला आहे. तर काहींनी सेलिब्रेटींना भेटण्याची ‘निंजा टेक्निक’ (Ninja Technique) असं म्हणत मुलीची खिल्ली उडवली आहे.

 

29 एप्रिलला रिलीज होणार ‘हिरोपंती 2’

हिरोपंती 2 सिनेमामध्ये टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा अहमद खान यांनी दिग्दर्शित (Directed Ahmed Khan) केला असून साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांनी त्याची निर्मिती केली आहे. हा सिनेमा येत्या 29 एप्रिलला प्रदर्शीत होत आहे. हिरोपंती हा चित्रपट 2014 मध्ये रिलीज झाला होता आणि याच चित्रपटातून टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता त्याचा हिरोपंती 2 हा चित्रपट रिलीज होत आहे.

 

Web Title :- Tiger Shroff | tiger shroff fan fainted after seeing actor at heropanti 2 promotion watch video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा