‘या’ ‘HOT’ TikTok सुपरस्टारनं फॉलोवर्सच्या बाबतीत बॉलिवूड अ‍ॅक्टर्सनाही टाकलं मागे !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टिक टॉक सुपरस्टार जन्नत जबैर रहमानीचा नवीन व्हिडीओ रिलीज होणार आहे. जन्नतने पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंह सोबत HELLO HI नावाने व्हिडीओ रिलीज करण्याची घोषणा केली आहे. याआधी तिने एका ब्युटी कंपनीच्या प्रॉडक्टला घेऊन व्हिडीओ रिलीज केला होता. यात ती डान्स करताना दिसली. हा व्हिडीओ 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

जन्नत टिक टॉकवर खूप फेमस आहे. तिचे 10 मिलियन्सहून अधिक म्हणजे 1 कोटीहून अधिक फॉलोवर्स आहेत. फॉलोवर्सच्या बाबतीत ती बॉलिवूड स्टार्सलाही टक्कर देते. फुलवा या टीव्ही मालिकेत तिने चाईल्ड आर्टीस्ट म्हणून काम केलं आहे. जन्नत अवघ्या 17 वर्षांची आहे. इंस्टावर तिचे फॉलोवर्स एवढे आहेत की, याबाबतीत ती सपना चौधरीलाही मागे टाकते.

https://www.instagram.com/p/B3MY7M2H3hw/

सपनाचे एकूण 20 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. जान्हवी कपूरचे 60 लाख फॉलोवर्स आहेत. परंतु जन्नतने तर जान्हवीला मागे टाकले आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खानही थोड्याच अंकाने जन्नतच्या पुढे आहे.

जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, दिल मिल गए, माटी की बानो, एक थी नायिका यांसारख्या मालिकेत तिने काम केलं आहे. 2002 साली जन्मलेली जन्नत टीव्ही पासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र राज्य करते. तिचे अनेक म्युझिक व्हिडीओदेखील रिलीज झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ इंस्टावर 34 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला होता.

जन्नतचे नैनो तले, तेरे बिना, चाल गजब है, इश्क फर्जी यांसारखे अनेक म्युझिक व्हिडीओ सुपरहिट आहेत. तिने टी सीरीजसोबतही काम केलं आहे. तिचं जन्नत जुबेर रहमानी नावाने एक अ‍ॅपही आहे. तुम्ही पैसे पे करून तिची प्रत्येक पोस्ट पाहू शकता.

https://www.instagram.com/p/B00tbxDnww4/

Visit : Policenama.com