‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरत असताना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा (third wave) धोका ओळखून शासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आवश्यक ते औषधे, वैद्यकीय उपकरणे (Medicines, medical equipment) यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही (Rural area) याचा मोठ्या प्रमाणात साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. ते टास्क फोर्समधील (Task Force) डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी (Doctors, senior officer) यांच्या समवेत झालेल्या बैठकीत बोलत होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

आपण दोन महिन्यात तिसऱ्या लाटेला सामोरे जाऊ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण (Siro survey) करावे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण (Vaccination) पूर्ण करण्यावर भर देताना निर्बंधांचे पालन (restriction) काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम (Rules of health) पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

 

दुसऱ्या लाटेने बरेच काही शिकवलं

पहिल्या लाटेच्या (first wave) वेळेस आपल्याकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करीत गेलो, दुसऱ्या लाटेने देखील आपल्याला बरेच काही शिकवलं आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ही लाट ओसरत असताना त्यातील अनुभवातून (experience) आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स, ऑक्सिजन (Medicine, health facilities, beds, oxygen) उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. ऑगस्ट-सप्टेंबर पासून देशाला 42 कोटी लसी मिळताहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

लसीकरण हा लढाईचा महत्त्वाचा भाग
देशाला लसींचा पुरवठा होत असल्याने त्याचा फायदा महाराष्ट्रालाही (Maharashtra) होईल. लसीकरण हा या लढाईतील महत्त्वाचा भाग (important part) असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे (Mask), सुरक्षित अंतर (Safe distance) ठेवणे हे आवश्यक आहे. या बैठकीत पुढच्या काळात लागणारी संभाव्य औषधे, त्यांची खरेदी, त्यासाठी लागणारा निधीची तरतूद (Provision of funds), आरटीपीसीआर कीट, मास्क, पीपीई किट्स, अशा बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

Wab Title :- time tighten restrictions cm uddhav thackeray expressed fears about third wave corona

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये