म्हणे ‘खेकड्यांनी’ तिवरे धरण फोडलं ; जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा ‘अजब’ दावा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – तिवरे धरण फुटून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाल्यानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आज यासंदर्भात अजब विधान करत याचे खापर चक्क खेकड्यांच्या माथी फोडले आहे. खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटलं असून, अधिकाऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं देखील असंच मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आज केला. त्यांनी चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांची पाठराखण करताना ते या घटनेला जबाबदार नसल्याचे सांगितले.

विरोधी पक्षांकडून आमदार चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी :
धरणाचे ठेकेदार प्रस्थापित आमदार सदानंद चव्हाण हेच असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सावंतांनी ‘माझं आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी बोललो आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अचानक पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे हे झालेल आहे. हे काम २००४ साली हॅन्डओव्हर झाल्याने चव्हाणांचा यात संबंध नाही’ असं सांगितलं. मला हि माहिती ग्रामस्थांनी दिली असून चव्हाणांची बाजू घेण्याचा हेतू नाही असे सावंतांनी सांगितले. त्याचबरोबर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी मागणी विरोधीपक्षाने केलेली आहे. महाजन यांनी मात्र सत्यस्थिती स्वीकारत गावकऱ्यांनी तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत तक्रार केल्याचे मान्य केले होते.

गुन्हा दाखल होण्यास लागणार २-३ महिने :
‘दुर्घटनेला ४८ तास उलटले असून अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही?’ असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता या प्रश्नावर ‘गुन्हा कोणावर दाखल करणार?’ असा प्रतिप्रश्न तानाजी सावंतांनी केला. तसेच यासंदर्भात स्पष्टीकरण देताना समिती नेमलेली असून चौकशी झाल्यावर आरोप निश्चित होतील आणि त्यानंतर गुन्हा दाखल होईल. या प्रक्रियेला २-३ महिने लागतील असं ते म्हणाले.

२००० साली तिवरे धरणाचं बांधकाम पूर्ण झालं असून हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतं. या धरणाची क्षमता २० लाख क्युबिक मीटर इतकी आहे. परंतु त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे कारण दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागल्याच्या तक्रारी येत होत्या. या धरणाच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी आणि पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो.

पुण्यात काही दिवसांपूर्वी मुठा नदीच्या कालव्याची भिंत फुटून अपघात झाला होता. त्यावेळी उंदीर आणि खेकड्यांमूळे असं झाल्याचं सांगितलं गेलं होतं. त्या प्रकाराची पुनरावृत्ती जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून यावेळी होताना दिसत आहे.

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा