ममता बॅनर्जींना आणखी एक ‘धक्‍का’ ; तृणमूलच्या 17 नगरसेवकांची भाजपमध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूकीत भाजपला तब्बल 19 जागा मिळाल्याने धक्का बसलेल्या ममता बॅनर्जींना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दार्जिलिंगमध्ये भाजपला मोठा मासा गळाला लागला आहे. कारण भाजपच्या तंबूत टीएमसीचे तब्बल 17 नगरसेवक दाखल झाले आहेत. थंड अशा दार्जिलिंग मध्ये यामुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. या 17 नगरसेवकांनी भाजपच्या मुकूल राँय आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला.

मुकूल रॉय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दार्जिलिंग नगर पालिकेत आता भाजपने बहुमत प्राप्त केला आहे. आणि हा तर फक्त सिनेमाचा ट्रेलर आहे. त्यांनी असा देखील दावा केला की आपल्या संपर्कात टीएमसीचे अनेक नेते आहेत. अनेक टीएमसी नेता भाजपमध्ये प्रवेश करु इच्छितात.

लोकसभेत यश मिळवल्यावर आता विधानसभेत यश मिळवण्यासाठी भाजपने लक्ष निर्धारित केले आहे. तसेच असा दावा केला की ममता बॅनर्जी यांनी विधानसभेच्या निवडणूकीत विरोधी पक्ष नेता हे पद देखील मिळणार नाही.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी आणि जिंकलेल्या जागा पाहिल्या तर बंगालमध्ये टीएमसीनंतर मोठा पक्ष हा भाजपच आहे. त्यामुळे भाजपात जोरदार इंनकमिंग सुरु झाले आहे. बंगाल मधील स्थानिक पातळीवरील टीएमसी आणि काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत.

भाजपची वाजपेयीची काळापासून बंगालमधून संसदेत निवडूण जाणारी एकमात्र जागा होती आणि ती म्हणजे दार्जिलिंग, परंतू आता मात्र भाजप दार्जिलिंगमध्ये पाय रोवू लागला आहे. या क्षेत्रातील टीएमसीचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भविष्यात बंगालमध्ये भाजपचे आस्तित्व आणखी मजबूत होणार असे दिसत आहे.