शिवसेनेला खुश करण्यासाठी या दोन नेत्यांचा भाजप देणार बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – युती होईल की नाही हा संभ्रम अजुनही कायम आहे. शिवसेना काही जागांवर भाजप कडे असून बसली आहे. देशात सत्ता मिळवायची असेल तर. महाराष्ट्राची मदत भाजप ला घ्यावीच लागणार आहे. हे भाजप ला माहिती आहे. त्यामुळे भाजप यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय. पण यात भाजपच्या काही नेत्यांना पीछेहाट स्वीकारावी लागेल का. तर हो कदाचित शिवसेनेला मनवण्यासाठी म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजकीय बळी देण्याचा विचार पक्षात सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी रावेर आणि जालना मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येईल अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

सोबतच लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची असल्यास विधानसभेचाही फॉर्म्युला त्वरित ठरवून घ्या अशी मागणी सेनेनी भाजपकडे केली आहे. महाराष्ट्रात आपल्या शिवाय भाजपाला बहुमत मिळणे अशक्य असल्याचे कळून चुकल्यामुळे काही जागाही वाढवून मिळाव्यात, असा शिवसेनेत मतप्रवाह आहे. शिवसेनेच्या या मागण्यांवर भाजप विचार करत आहे . शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघाची मागणी केली असली तरी, भाजप त्यासाठी तयार नाही. पालघरऐवजी रावेर आणि जालना मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा भाजपात विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

रावेर मतदारसंघात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे, तर जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजप च्या या दोन्ही जागांवर सहज विजय संपादन करता येईल अशा जागा भाजप शिवसेनेला देईल का ? की यात भाजपचा काही डावपेच आहे. अशी चर्चा सेनेतील जेष्ठ नेत्यांमध्ये सुरु आहे. जालना मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात वाद दिवसेंदिवस वाढत आहे. युती झाली तरी मी दानवेचा पराभव करणारच, असे खोतकर यांनी अनेकदा जाहीर केले आहे. त्यामुळे हा मतदारसंघच शिवसेनेला सोडून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपातील चाणाक्ष करत आहे.

युतीसाठी धडपड

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 26, तर शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. शिवसेनेच्या मागणीनुसार आणखी एखादी जागा देण्यास भाजप तयार आहे. त्याचाच एक भाग म्हणून रावेर आणि जालना देऊन शिवसेनेकडील एखादी जागा घेऊन सेनेला खूश करण्याचा प्रयत्न असेल, असे भाजपने सांगितले.