बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ पद्मशाली समाजाचा भिवंडीत मूकमोर्चा

भिवंडी :पोलीसनामा ऑनलाईन

एका अल्पवयीन मुलीवर अहमदनगर तोफखाना परिसरात १३ सप्टेंबरला बलात्कार करण्यात आला होता. या गुन्ह्यातील नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी निषेध करण्यात येत आहे. भिवंडी शहरातील अखिल पद्मशाली समाजाच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19578301-c150-11e8-9b0b-9f3f1d20a87f’]

यंत्रमाग नगरीत विणकर म्हणून वास्तव्यास आलेल्या पद्मशाली समाजाची मोठी लोकसंख्या असून त्यांची अखिल पद्मशाली समाज ही शिखर संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या नेतृत्वाखाली शहरातील पद्मानगर येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मूकमोर्चा काढण्यात आला होता. भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत, याची दखल शासनाने तातडीने घेवून अंमलबजावणी करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या मूकमोर्चात महिलांसह हजारोच्या संख्येने शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.

चार वर्षाच्या मुलीवर शिक्षिकेचा लैगिंक अत्याचार?

संपूर्ण महाराष्ट्रात अहमदनगरमधील घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे.पीडित मुलगी पद्मशाली समाजाची आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी अख्तर लतीफ सय्यद यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधातील खटला हा फास्ट टड्ढक न्यायालयात चालवावा, सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, नराधम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ लाखांची मदत द्यावी, अशी मागणी अखिल पद्मशाली समाजाने  केली आहे.