गृहप्रकल्पाचे काम कोणत्या नातेवाईकास द्यायचे यावरून स्थायी तहकुब – लांडे

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पंतप्रधान आवास योजनेच्या बोऱ्हाडेवाडी येथील गृहप्रकल्पाचे काम कोणत्या नातेवाईक ठेकेदाराला द्यायचे याबाबत निर्णय झाला नसल्यामुळेच स्थायी समिती सभा तहकूब केली जात असल्याचा घाणाघाती आरोप माजी आमदार विलास लांडे यांनी शुक्रवारी केला. सत्ताधारी भाजपने शहरात एकही विकासाचे काम केले नसून राष्ट्रवादीच्या कामावरच भाजपचे नेते उड्या मारत असल्याचतेही लांडे म्हणाले.
[amazon_link asins=’B07DZZKBBL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4cb8dd09-8696-11e8-a1ca-654e7eb9fdaa’]

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी पिंपरीत आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, सरचिटणीस फजल शेख, माजी नगरसेवक निलेश पांढारकर, विशाल काळभोर, लाला चिंचवडे आदी उपस्थित होते.

लांडे म्हणाले, अण्णासाहेब मगर ते अजितदादा पवार यांनी शहराचा नियोजनपूर्वक विकास केला आहे. त्यामुळेच शहराची देशभरात ओळख आहे. परंतु, आता  शहराचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालला आहे. भाजपने आजपर्यंत शहरासाठी एकही चांगला निर्णय घेतला नाही. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील कामांवर बाता मारतात.

पंतप्रधान आवास योजनेच्या बोऱ्हाडेवाडी येथील गृहप्रकल्पाचे काम कोणत्या नातेवाईकाला द्यायचे याबाबत निर्णय झाला नसल्यामुळेच स्थायी समिती सभा दोनदा तहकूब केली जात आहे. प्राधिकरण, एमआयडीसीच्या जागेवर बेकायदेशीरपणे ताबे मारले जात आहेत. शहरात अतिक्रम वाढले आहे. महापालिका आयुक्त सक्षम नसल्याने शहराची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सक्षम आणि कडक स्वभावाचे अधिकारी अशी ओळख असलेले डॉ. श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची शहराला गरज असल्याचे लांडे म्हणाले.
[amazon_link asins=’B077PWB22Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’52566452-8696-11e8-9615-2507cf179953′]

कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा
पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव हा राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या काळातील आहे. शहरात कायदा सुव्यस्थेचा बोजवारा उडाला असून महिला, मुली असुरक्षित आहेत. यापूर्वी भोसरीत गुन्हेगारी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हती. मात्र सध्या भोसरी भयभीत आहे असेही लांडे म्हणाले.