25 फेब्रुवारी राशिफळ : ‘या’ राशीच्या जातकांना मिळेल ‘मान-सन्मान’ आणि होणार ‘धनलाभ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – तुम्हाला आजचा दिवस थोडे सांभाळून रहावे लागेल. खर्च खुप वाढतील. परंतु, धर्मकर्माच्या कामात मन लागेल. आरोग्य थोडे कमजोर राहिल. थंडी, उष्णता यापासून जपून रहा, कारण आजारी पडण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात आजचा दिवस कमजोर आहे. कामात स्थिती खुप चांगली राहिल. कुटुंबियांची साथ लाभेल. कौटुंबिक जीवन सुखशांतीचे राहिल. आज अचानक उत्पन्न वाढण्याचे योग आहेत.

वृषभ
तुमच्यासाठी आजचा दिवस खुपचा चांगला आहे. आजारातून बरे होऊ शकता. आरोग्य चांगले राहिल. उत्पन्न वाढेल. मान-सन्मान प्राप्त होईल. एखाद्या खास पार्टीत सहभागी होऊ शकता. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. विवाहितांच्या जीवनात तणावातही स्थिती मजबूत राहिल. कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदीत राहिल. कामात यश मिळेल.

मिथुन
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप कामांचा असणार आहे. कौटुंबिक जीवन आनंद देईल. विवाहितांच्या जीवनात तणाव राहिल. सुख-सुविधांवर भरपूर खर्च कराल. विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्याल. प्रेमसंबधात आजचा दिवस सामान्य रहाणार आहे. मन लावून काम केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. एखाद्या व्यक्तीला मनातील गोष्ट सांगाल.

कर्क
तुमच्या राशीसाठी आजचा दिवस खुपच चांगला आहे. एखाद्या प्रवासाठी जाऊ शकता. भाग्य सोबत असल्याने प्रत्येक कामात यश मिळेल. मेहनतीला यश मिळेल. दाम्पत्य जीवनात प्रेम आणि स्नेह वाढेल. प्रेमसबंधात समस्या येऊ शकतात. खर्च वाढतील. दूरच्या प्रवासाठी जाऊ शकता. हा प्रवास सुख देणारा ठरू शकतो. कुटुंबात प्रेम कायम राहिल. विनाकारण कोणत्याही भानगडीत पडू नका.

सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर आहे. कुटुंबात तणाव राहिल आणि मानसिक दृष्ट्या कमजोर राहाल. यासाठी मन आनंदी ठेवण्यासाठी ध्यान, योग करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यासोबत वेळ घालवल्यास आनंद मिळेल. कामात स्थिती ठिक राहिल. परंतु, कामात मन लागणार नाही. खुप दिवसांपासून प्रलंबित काम मार्गी लागल्याने धनलाभाचा योग आहे.

कन्या
तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. विवाहित जातकांना आनंद मिळेल आणि जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. कामात आजचा दिवस खुप चांगला आहे. कुटुंबातील वातावरणही चांगले राहिल. आज तुमच्या घरी अनेक लोक येऊ शकतात. एखादी मोठी व्यक्ती किंवा खास मित्र घरी आल्याने घरातील वातावरण आनंददायी राहिल. प्रेमसंबंधात आजचा दिवस रोमँटिक राहणार आहे. आज तुमचे काम खुप उत्साहाने पार पाडाला. दिवस चांगला बनवाल.

तुळ
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आणि कामासाठी सुद्धा दिवस खुप चांगला राहणार आहे. कुणाबद्दलही वाईट बोलू नका, अन्यथा अडचणी वाढतील. तसेच होत असलेले काम बिघडू शकते. मित्रांसोबत मौजमजेत वेळ घालवाल. प्रेमसंबंधात आजचा दिवस कमजोर आहे. कुटुंबातील छोट्यांना तुमच्या मदतीची गरज भासेल. कामात सहकार्‍यांशी चांगले वागा. ते तुम्हाला खुप मदत करतील.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदवार्ता घेऊन येऊ शकतो. प्रेमसंबंधात महत्वपूर्ण क्षण येईल. तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगू शकते. कौटुंबिक जीवन आनंदमय राहिल. पाहुण्यांचे येणे-जाणे होऊ शकते. कुटुंबात एखादी पार्टी होऊ शकते. व्यवहारावर लक्ष ठेवावे लागेल. दाम्पत्य जीवनात सुधारणा होईल. कामानिमित्त केलेल्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल. आजच्या दिवशी वाहन जपून चालवा.

धनु
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कौटुंबिक जीवनातही दिवस खुप चांगला आहे. घरातील लोकांवरील प्रेम वाढेल. त्यांचे सहकार्य प्रत्येक कामात मिळेल. खर्च थोडा वाढले. आजचा दिवसाचा पूर्ण आनंद घेऊ शकता. मन आनंदीत राहिल. कामात मेहनत करून अनेक नवी कामे मार्गी लावाल, ज्यामुळे तुमचे कौतूक होईल. दाम्पत्य जीवन आनंददायी राहिल. आज तुम्हाला धनलाभ होईल.

मकर
आजचा दिवस एखाद्या प्रवासाठी चांगला राहिल. उत्पन्नात वाढ होईल. खर्च भागवू शकता. मानसिकदृष्ट्या प्रसन्न रहाल. कुटुंबात आनंद राहिल. प्रॉपर्टीतून लाभ मिळेल. ऑफिसमध्ये तुम्हाला एखाद्या प्रवासासाठी पाठवण्याबाबत विचार होऊ शकतो. प्रेमसंबधात प्रिय व्यक्तीचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि ती तुम्हाला पूर्ण खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. दाम्पत्य जीवनात थोडे सावध रहा.

कुंभ
तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. मात्र, कामात आज तुम्हाला जबरदस्त यश मिळेल. यावरून कौतूक होईल आणि तुमची बढतीसुद्धा होऊ शकते. उत्पन्नातही वाढ होण्याचे योग आहेत. आज तुम्ही सुख आणि सुविधांवर खुप खर्च कराल. जीवन आनंदाने जगाल. कुटुंबात थोडे टेन्शन राहिल, परंतु तुमच्या मधुरवाणीमुळे घरातील लोकांकडून प्रेम मिळेल.

मीन
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. आपल्या लोकांची काळजी घ्याल. दाम्पत्य जीवनात आजचा दिवस खुप चांगला आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेम द्याल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती तुम्हाला भरपूर आनंद देईल. कामात स्थिती तुमच्या बाजून राहिल. परंतू मेहनत थोडी जास्त करावी लागेल. उत्पन्नासाठी आजचा दिवस चांगला आहे.