नवी दिल्ली : Today Horoscope | ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे भविष्य सांगतात. दैनिक राशिफळ (Dainik Rashifal) हे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित एक जन्मकुंडली आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) दैनंदिन अंदाज स्पष्ट केले जातात. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभर घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे भाकीत करते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. उदाहरणार्थ, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली सांगते की आजचे तुमचे ग्रह-तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हे समजू शकते. दैनंदिन कुंडली वाचून, तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी (संधी आणि आव्हाने) तयार राहू शकता.
मेष (Aries Daily Horoscope)
आरोग्याच्या दृष्टीने दिवस कमकुवत आहे. आरोग्याच्या समस्यांमुळे चिंतेत असाल. वाढत्या खर्चामुळे चिंतेत रहाल. कुटुंबातील लहान मुलांसोबत मजा करण्यात थोडा वेळ घालवाल. डोळे आणि कानांशी संबंधित काही समस्या असतील तर दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या. संततीच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या. कोणतेही काम नशिबावर सोडू नका, अन्यथा अपयश येईल.
वृषभ (Taurus Daily Horoscope)
आज व्यवसायात मोठा नफा मिळेल. चांगली बातमी ऐकल्याने आनंद वाटेल. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका, अन्यथा ते अडचणीत आणतील. हवामानाचा विपरीत परिणाम होईल, ज्यामुळे डोकेदुखी, अंगदुखी, थकवा इत्यादी समस्या होऊ शकतात. मनापासून लोकांचा चांगला विचार कराल, त्यांचे भले कराल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतो, त्यामुळे मन थोडे अस्वस्थ होईल.
मिथुन (Gemini Daily Horoscope)
कोणतेही मोठे काम टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. सरकारी योजनेत सहभागी होऊ नका, त्यात पैसे गुंतवले तर नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा तुमचे बोलणे वाईट वाटेल. जुन्या मित्राला भेटाल. इतरांच्या मदतीसाठी पुढे या.
कर्क (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस कठोर परिश्रम करण्याचा आहे. कार्यक्षेत्रात भरपूर मेहनत केल्याने यश मिळेल. जोडीदारासोबत छोटा प्रवास करू शकता. पण त्याच्या/तिच्या करिअरबद्दल काळजी वाटत असेल, तर चर्चा करू शकता. भागीदारीत काम करणे चांगले राहील. कोणतेही काम करण्यासाठी नशिबावर सोडू नका, अन्यथा समस्या येऊ शकते.
सिंह (Leo Daily Horoscope)
आजचा दिवस कठोर परिश्रम करण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ मजेत घालवाल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते पुढे ढकला, अन्यथा समस्या उद्भवू शकते. प्रामाणिकपणाने आणि परिश्रमाने सर्व काही मिळवू शकता, ज्याची आजपर्यंत कमतरता होती. व्यवहाराशी संबंधित खूप दिवसांपासून त्रास देणारी बाब दूर होईल. वडिलांच्या आरोग्याबाबत सावध रहा, अन्यथा समस्या उद्भवू शकते.
कन्या (Virgo Daily Horoscope)
आज सभोवतालचे वातावरण आनंददायी असेल. पैशाची कमतरता भासणार नाही. कोणाकडून पैसे घेतले असतील, तर परतफेड कराल. आयुष्याला एका नवीन दिशेने पुढे न्याल. गुंतागुंतीमुळे वेळेवर निर्णय घेऊ शकणार नाही. भविष्याच्या एखाद्या गोष्टीबाबत काळजी कराल. परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
तूळ (Libra Daily Horoscope)
आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. संततीकडून चांगली बातमी ऐकू येईल. कुटुंबातील लहान मुलांसोबत थोडावेळ मजेत घालवाल. नोकरीत महत्त्वाची माहिती कुणालाही सांगू नका, अन्यथा डोकेदुखी ठरू शकते. प्रेमसंबंधात जोडीदाराची कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकता, ज्यामुळे लग्नाला मंजुरी देखील लगेच मिळू शकते.
वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)
आजचा दिवस गुंतागुंतीचा आहे. कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांमुळे थोडे चिंतेत असाल, ज्यासाठी अनुभवी व्यक्तीशी बोलावे लागेल. कार्यक्षेत्रात मेहनत केली, तरच योजना पुढे नेण्यास सक्षम व्हाल. जोडीदारावर एखाद्या गोष्टीवरून नाराजी असेल तर ती दूर होईल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करू शकता.
धनु (Sagittarius Daily Horoscope)
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे.
सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.
राजकारणात मोठे पद मिळेल. सरकारी योजनेचा पुरेपूर घ्याल. शिक्षणात येणाऱ्या अडचणींबद्दल मित्राशी बोलावे लागेल.
मकर (Capricorn Daily Horoscope)
आजचा दिवस खर्चिक आहे. कुटुंबातील सदस्यांमुळे विनाकारण चिंता वाटेल.
महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा, अन्यथा नंतर काही समस्या निर्माण होऊ शकतात.
वाढत्या खर्चामुळे चिंतेत असाल, ज्यासाठी उत्पन्न आणि खर्चाचे बजेट बनवा.
उत्पन्नाचा काही भाग भविष्यासाठी बाजूला ठेवा, तरच भविष्य सक्षम होईल.
कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत अचानक बिघडल्याने धावपळ होईल.
कुंभ (Aquarius Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. शिक्षणात अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल.
कार्यक्षेत्रात मन थोडेसे चिंतेत असेल. ज्यांना नोकरीबरोबरच पार्टटाइम काम करायचे आहे, तर त्यासाठी वेळ काढू शकाल.
मनात एखाद्या गोष्टीबद्दल विनाकारण तणाव राहील.
कुटुंबातील सदस्यांसह सरप्राईज पार्टीला जाण्याचा बेत आखू शकता. शिक्षणात अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते.
मीन (Pisces Daily Horoscope)
आजचा दिवस लाभदायक आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर यश मिळेल.
मन एखाद्या गोष्टीबद्दल विचलित होईल. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते.
सहकाऱ्यांकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल.
नोकरीत इतर कामाची ऑफर मिळू शकते. वडिलांकडून भेटवस्तू मिळू शकते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update