06 September Rashifal : मिथुन, कन्या आणि तुळसह २ राशीच्या जातकांना मिळू शकते शुभवार्ता, वाचा दैनिक भविष्य

नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे भविष्य सांगतात. दैनिक राशिफळ (Dainik Rashifal) हे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित एक जन्मकुंडली आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) दैनंदिन अंदाज स्पष्ट केले जातात. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभर घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे भाकीत करते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. उदाहरणार्थ, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली सांगते की आजचे तुमचे ग्रह-तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हे समजू शकते. दैनंदिन कुंडली वाचून, तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी (संधी आणि आव्हाने) तयार राहू शकता.

मेष (Aries Daily Horoscope)

आजचा दिवस आनंददायी आहे. कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाऊ शकता. एखादी समस्या दूर होईल. जोडीदारावर नाराज राहाल. एखादे काम डोकेदुखी ठरू शकते. एखाद्या कामासाठी भावंडांची मदत घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या विवाहातील अडथळे मित्राच्या मदतीने दूर होतील. कोणाकडून पैसे घेणे टाळा.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आज शासनाकडून सहकार्य मिळेल. नोकरीसह इतर कामामुळे चिंतेत राहाल. खूप दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. जोडीदारासोबत रोमँटिक डेटवर जाण्याचा विचार कराल. कामात विरोधक त्रास देतील, त्यांच्यापासून सावध राहा. संततीला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल, अन्यथा ते नाराज होतील.

मिथुन (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. कार्यक्षेत्रात बढती होईल. यशाच्या शिडीवर चढाल. लहान मुले काहीतरी मागणी करू शकतात, जी पूर्ण करावी लागेल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठांशी असलेले मतभेद चर्चेतून संपुष्टात येतील. शिक्षणात क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.

कर्क (Cancer Daily Horoscope)

आज मान-सन्मान वाढेल. राजकारणात एखाद्या मोठ्या नेत्याला भेटण्याची संधी मिळेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कामात येत असलेली अडचण दूर होईल. अभ्यासापासून विचलित होऊ शकता. इतर कामांवर लक्ष केंद्रित कराल. वडिलांना डोळ्यांशी संबंधित समस्या होऊ शकते.


सिंह (Leo Daily Horoscope)

व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. व्यावसायात नवीन प्रोजेक्ट सुरू करताना डोळे आणि कान उघडे ठेवा. सरकारी योजनेचा लाभ मिळेल. एखादा मित्र खूप दिवसांनी भेटायला येईल. कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांबाबत सदस्यांशी संवाद साधाल. घराची रंगरंगोटी इत्यादींचे नियोजन कराल.

कन्या (Virgo Daily Horoscope)

आज प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. एखादे काम नशिबाच्या भरवशावर केले तर यश नक्कीच मिळेल. संततीच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा ते चुकीच्या कामाकडे वळू शकतात. जोडीदाराच्या करिअरची चिंता दूर होईल. खूप दिवसांपासून रखडलेले एखादे जुने काम पूर्ण होईल.

तूळ (Libra Daily Horoscope)

आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. नवीन पाहुण्याचे आगमन होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला घरापासून दूर नोकरी लागल्याने जावे लागू शकते. एखादे काम पूर्ण न केल्याने अडचणी निर्माण होतील. मोठी डील तुमच्या हातात येता-येता निसटू शकते. व्यवसायात नवीन उपकरणांचा समावेश कराल. ज्यामुळे उत्पन्न वाढेल. आईच्या बाजूकडील लोकांच्या भेटीगाठीसाठी जाऊ शकता.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस सामान्य आहे. उदासिन वर्तनामुळे कामात लोकांना नाराज कराल. व्यवसायात पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर सहज मिळतील. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी सर्व बाजू स्वतंत्रपणे तपासा. नवीन काम सुरू करणे चांगले राहील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतील.

धनु (Sagittarius Daily Horoscope)

आजचा दिवस मोठी संधी देणारा आहे. प्रगती पाहून विरोधकांनाही आश्चर्य वाटेल.
कोणताही निर्णय घाईने किंवा भावनिक होऊन घेऊ नका.
सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. सरकारी काम पुढे ढकलल्यास,
ते नंतर नवीन समस्या येऊ शकते. एखाद्या मित्राला जेवणासाठी आमंत्रण द्याल. यासाठी पैसे खर्च कराल.

मकर (Capricorn Daily Horoscope)

पैशाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. नोकरीसोबत अर्धवेळ काम करण्याचा विचार करत
असाल तर इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात भागीदार बनण्याचा विचार करत असाल तर त्याची सखोल चौकशी करा.
संततीकडून चांगली बातमी समजू शकते. प्रवासाला जाण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.
नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आज कुंभ राशीच्या जातकांचा प्रभाव आणि धाडस वाढेल.
कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्र बसून समस्यांवर चर्चा कराल.
कुणाची फसवणूक अथवा विश्वासघात आवडणार नाही, यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो.
व्यवसायात शत्रूमुळे नुकसान होऊ शकते. वादातही संयम ठेवा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

मीन (Pisces Daily Horoscope)

आजचा दिवस पैशाशी संबंधित काही समस्या घेऊन येणार आहे. उधार दिलेले पैसे परत मिळणार नाहीत.
त्यामुळे मन अस्वस्थ राहील. जोडीदार व्यवसायाशी संबंधित चांगला सल्ला देईल.
बाहेर फिरताना एखादी महत्त्वाची माहिती मिळेल. महत्वाची माहिती लीक होऊ देऊ नका.
महत्त्वाच्या कामांना उशीर करणे टाळा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडू यांनी बोलून दाखवली पंकजा मुंडेंसोबत युतीची इच्छा; राज्यात नवे राजकीय समीकरण?

Maratha Reservation | थोडी सबुरी ठेवावी लागले, सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल