1 August Rashifal : मेष आणि मिथुनसह या ५ राशीवाल्यांसाठी महिन्याचा पहिला दिवस चांगला, मिळेल यश

नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे भविष्य सांगतात. दैनिक राशिफळ (Dainik Rashifal) हे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित एक जन्मकुंडली आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) दैनंदिन अंदाज स्पष्ट केले जातात. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभर घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे भाकीत करते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. उदाहरणार्थ, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली सांगते की आजचे तुमचे ग्रह-तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हे समजू शकते. दैनंदिन कुंडली वाचून, तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी (संधी आणि आव्हाने) तयार राहू शकता.

मेष (Aries Daily Horoscope)
आजचा दिवस भाग्याच्या दृष्टीकोनातून चांगला आहे. पुण्य कार्याचा पूर्ण लाभ मिळेल. व्यवसायात वाढ झाल्यामुळे आनंद होईल. कामात आत्मविश्वासाने पुढे जाल. शारीरिक समस्या दूर होईल. घराच्या नूतनीकरणावर लक्ष केंद्रित कराल. पैसेही गुंतवाल. आनंद पाहून विरोधक हेवा करतील. पण काळजी करण्याची गरज नाही. आध्यात्मिक कार्यात आवड वाढेल.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आज व्यवहारात सावधगिरी बाळगा. मेहनतीच्या बळावर खूप काही मिळवू शकता. पण संयम बाळगा. वैयक्तिक बाबींमध्ये बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील मंदीमुळे थोडे चिंतेत राहाल. स्वभाव चिडचिडा होईल. नोकरी सोबत अर्धवेळ काम करायचे आहे, त्यांना वेळ मिळेल.

मिथुन (Gemini Daily Horoscope)
आज निर्णय क्षमतेचा फायदा होईल. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाल. मित्र आणि सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा. नवीन करारांमुळे फायदा होईल. संततीकडून निराशाजनक माहिती ऐकायला मिळेल. भावा-बहिणीच्या लग्नातील अडचणीसाठी मित्रांशी बोलावे लागेल, तरच अडचण दूर होईल. महत्वाची माहिती कोणाशीही शेअर करू नका.

कर्क (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस आव्हानात्मक आहे. कार्यक्षेत्रात मोठी संधी मिळेल. बँकिंग क्षेत्रात बचत योजनेचा चांगला लाभ मिळेल. मेहनत करून अधिकाऱ्यांना खूश कराल. सहकाऱ्यांचा सहवास आज मिळेल. सेवा क्षेत्रात पूर्ण रस असेल. जोखमीच्या कामात हात घालणे टाळा. विनाकारण एखाद्या गोष्टीची चिंता करत राहाल. ते व्यर्थ ठरेल. संततीकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील.

सिंह (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस सामान्य आहे. विद्याथ्र्यांना शिक्षणासोबतच क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जास्त काम केल्यानंतर थकवा जाणवेल. उर्वरित कामाबद्दल चिंतेत रहाल. अतिरिक्त ऊर्जा इकडे-तिकडे वापरू नका. कुटुंबातील एखाद्या सदस्याला घरापासून दूर नोकरी मिळाल्याने जावे लागेल. मित्रासाठी पैशांची व्यवस्था करू शकता.

कन्या (Virgo Daily Horoscope)
आजचा दिवस बुद्धी आणि विवेकाने निर्णय घेण्याचा आहे. कोणाशीही वाद घालू नका. घरी पाहुणे आल्याने कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील. वडिलधाऱ्यांशी बोलताना मुद्दा मांडा, अन्यथा ते तुमच्यावर एखादा निर्णय लादू शकतात. प्रवासाला जाताना आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. नवीन लोक भेटतील. आवश्यक कामे पूर्ण करण्यात बराच वेळ घालवाल.

तूळ (Libra Daily Horoscope)
आजचा दिवस सामान्य आहे. बंधुभावात आवड वाढेल. नवीन संपर्कातून फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात सावध राहावे. अन्यथा कोणी विरोध करू शकतो. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेले काम पूर्ण होईल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. विद्याथ्र्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा अडचण येऊ शकते. कुटुंबातील लोक बोलण्याला पूर्ण आदर करतील. विद्यार्थी बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्त होतील.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस आनंदाचा आहे. ज्येष्ठांचे सहकार्य आणि आदर राखा. जुन्या परंपरा सोडून संततीच्या विचारावर पुढे जाल. सुखसोयींच्या वस्तूंच्या खरेदीवर खूप पैसा खर्च कराल. मालमत्तेशी संबंधी संयम बाळगा. नोकरीत कामाने लोकांची मने जिंकाल. नवीन वाहन खरेदी करू शकता. वैयक्तिक बाबींमध्ये चांगले काम कराल.

धनु (Sagittarius Daily Horoscope)   
आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची गाठ पडू शकते.
महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
कोणालाही न मागता सल्ला देणे टाळा. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवा.
सर्जनशील कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबातील कोणीतरी सरप्राईज पार्टीचे आयोजन करू शकते.

मकर (Capricorn Daily Horoscope)
आजचा दिवस खर्चिक आहे. सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल.
लोककल्याणाच्या कामात पूर्ण सहभाग असेल. कौटुंबिक नात्यात नम्रता ठेवा.
अन्यथा रक्ताच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वादाची स्थिती उद्भवली असेल
तर संपूर्ण स्थिती जाणून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. अन्यथा अधिकारी नाराज होऊ शकतात.
संतती नवीन वाहन घेण्याचा आग्रह करेल.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आज प्रभाव आणि वैभवात वाढ होईल. कुटुंबातील मोठ्या सदस्यांचा विश्वास जिंकाल.
जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. कामाच्या शोधात असलेल्यांसाठी दिवस चांगला आहे.
ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. लाभाची संधी मिळाली तर हातून जाऊ देऊ नका.
मित्रासोबत जुन्या आठवणींना उजाळा द्याल. व्यावसायिक बाबींनाही आज गती मिळेल. राजकारणात सावध राहा.

मीन (Pisces Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
वडिलधाऱ्यांचे खूप सहकार्य मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते.
पगार वाढेल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. कुटुंबात पार्टी आयोजित करू शकता.
दिनचर्येत बदल केले तर काही कामे दीर्घकाळ लटकतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 31 हजाराची लाच घेताना पुण्यातील वैद्यमापन शास्त्र विभागातील सह नियंत्रक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात