28 August Rashifal : कर्क, सिंह आणि कुंभ राशीसह दोन राशीवाल्यांसाठी आवठ्याचा पहिला दिवस शुभ

नवी दिल्ली :  Today Horoscope | ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे भविष्य सांगतात. दैनिक राशिफळ (Dainik Rashifal) हे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित एक जन्मकुंडली आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) दैनंदिन अंदाज स्पष्ट केले जातात. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभर घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे भाकीत करते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. उदाहरणार्थ, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली सांगते की आजचे तुमचे ग्रह-तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हे समजू शकते. दैनंदिन कुंडली वाचून, तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी (संधी आणि आव्हाने) तयार राहू शकता.

मेष (Aries Daily Horoscope)
व्यवसायिकांसाठी दिवस चांगला आहे, अपेक्षित नफा मिळेल. मालमत्तेच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगा. अन्यथा फसवणूक होऊ शकते. अशा लोकांपासून दूर रहा. कौटुंबिक सदस्यांसह शुभकार्यात सहभागी व्हाल, जिथे प्रभावशाली लोकांशी भेट होईल.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस सामान्य आहे. रखडलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. शैक्षणिक क्षेत्रातील समस्येला सामोरे जावे लागेल. जोडीदाराची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची माहिती बाहेर पडू देऊ नका.

मिथुन (Gemini Daily Horoscope)
आजचा दिवस गुंतागुंतीचा आहे. व्यवसायात एखादे नुकसान होऊ शकते. कोणत्याही योजनेत पैसे अतिशय काळजीपूर्वक गुंतवा. अन्यथा नुकसान होऊ शकते. सासरच्या लोकांशी झालेला दुरावा दूर होईल. प्रेमात जोडीदाराला कुटुंबातील सदस्यांना भेटायला आणू शकता. मनातील इच्छा पूर्ण झाल्याने आनंद होईल.

कर्क (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. व्यापारात एखाद्या डीलमध्ये येत असलेल्या अडचणी दूर होतील. आई-वडिलांशी खूप काळजीपूर्वक चर्चा करा. व्यवसायात निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. घाईत निर्णय घेतल्यास पश्चाताप होईल.

सिंह (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. एखादे काम पूर्ण झाल्याने आनंद होईल. दिवसाचा बराच वेळ काहीतरी विशेष करण्याचा आहे. घरात पाहुणे आल्याने कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील. कायदेशीर प्रकरणात डोळे आणि कान उघडे ठेवा, अन्यथा फसवणूक होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत बसून त्यांच्या समस्या ऐकण्यात थोडा वेळ घालवाल.

कन्या (Virgo Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र आहे. कार्यक्षेत्रात बदल करण्याची इच्छा पूर्ण होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. योगासने आणि व्यायामाचा अवलंब करून, आजार दूर ठेवू शकता. मनातील एखादी गोष्ट आई-वडिलांशी बोलू शकता. संततीला दिलेले वचन तुम्हाला पूर्ण करावे लागेल.

तूळ (Libra Daily Horoscope)
मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये विजयी मिळेल. नोकरीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळेल, परंतु ती लीक होऊ देऊ नका. जुन्या वादातून सुटका होईल. वडिलांना शारीरिक त्रास होत असेल तर आज तो कमी होईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा समस्या उद्भवू शकते. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस सामान्य आहे. कामात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू कराल.
करिअरच्या बाबतीत तणावाखाली असाल, ज्यामध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास तो दूर होईल.
अनुभवांचा पुरेपूर फायदा मिळेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेले काम पूर्ण होईल.
नोकरीत इच्छेप्रमाणे काम मिळाल्याने आनंदी व्हाल.

धनु (Sagittarius Daily Horoscope)
आजचा दिवस मेहनतीचा आहे. कुटुंबातील सदस्यासोबतच्या नात्यात आलेली कटुता संभाषणातून दूर करावी लागेल.
कामांबद्दल थोडे चिंतेत असाल, परंतु ती वेळेत पूर्ण होतील. कुटुंबातील लोकांना तुमचे एखादे बोलणे वाईट वाटू शकते.
अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात.

मकर (Capricorn Daily Horoscope)
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.
कामात शत्रूंपासून सावध राहा, अन्यथा ते अडथळे निर्माण करतील.
वडिलांना डोळ्यांशी संबंधित काही समस्या होऊ शकते. उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आजचा दिवस आनंदाचा आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. तब्येतीत बिघाड जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वाढता खर्च डोकेदुखी ठरेल, वेळीच त्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा आर्थिकस्थिती डळमळीत होईल.
इतर नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तिथून ऑफर मिळू शकते.

मीन (Pisces Daily Horoscope)
आजचा दिवस समस्याांचा आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी निराशाजनक माहिती ऐकायला मिळेल.
प्रवासात अत्यंत सावधगिरीने वाहन चालवा, अन्यथा अपघाताचा धोका आहे.
कार्यक्षेत्रात काही बदल करताना सावधगिरी बाळगा. कोणाचे ऐकून एखाद्याशी भांडण करू नये.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Papaya Leaf For Belly Fat | पोटाचा घेर होईल एकदम सपाट, ‘या’ पानांचा रस केवळ 20 दिवस प्या